महावितरणतर्फे वीजबिल थकबाकी धडक वसुली मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:12 IST2021-06-28T04:12:17+5:302021-06-28T04:12:17+5:30

वरखेडी, ता. पाचोरा : वरखेडी व भोकरी गावी महावितरण कंपनीतर्फे घरगुती वीज वापर तसेच व्यावसायिक वीज वापर करणाऱ्यांकडून थकबाकीची ...

MSEDCL collects electricity bill arrears | महावितरणतर्फे वीजबिल थकबाकी धडक वसुली मोहीम

महावितरणतर्फे वीजबिल थकबाकी धडक वसुली मोहीम

वरखेडी, ता. पाचोरा : वरखेडी व भोकरी गावी महावितरण कंपनीतर्फे घरगुती वीज वापर तसेच व्यावसायिक वीज वापर करणाऱ्यांकडून थकबाकीची धडक वसुली मोहीम राबविण्यात आली. यावेळी वीजबिल भरा नाहीतर आपला वीजपुरवठा खंडित केला जाईल, अशी वेळ येऊ देऊ नका, अशा पद्धतीने वसुली अधिकाऱ्यांनी वीजग्राहकांना आवाहन केले आहे.

महावितरणचे कर्मचारी ऊन, वारा पावसाची तमा न बाळगता अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी धडपडत असतो. त्यामुळे ग्राहकांनी आम्हाला वीजबिलाची थकबाकी भरून सहकार्य करावे, कोणाच्याही घरात अंधार असावा, असे आम्हाला वाटत नाही. परंतु नाइलाजास्तव आम्हाला वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ येते, असे पाचोरा विभाग कार्यकारी अभियंता श्याम दस्कर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता राम चव्हाण, उपकार्यकारी अभियंता आशिष राठोड, सहाय्यक अभियंता अमित चव्हाण तसेच वरखेडी आणि भोकरी गावातील वायरमन राजेश निकम, सुनील पाटील, गोवर्धन लोखंडे, आनंदा कोळी, हितेश गोराडे, अविनाश राठोड यांचा समावेश होता.

Web Title: MSEDCL collects electricity bill arrears