एम.एस्सी, एम.ए. अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 04:21 PM2020-11-20T16:21:27+5:302020-11-20T16:21:37+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा व संलग्नित महाविद्यालयातील एम.एस्सी., एम.ए. (भूगोल) प्रथम वर्ष या पदव्युत्तर ...

M.Sc., M.A. Start the admission process of the course | एम.एस्सी, एम.ए. अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया प्रारंभ

एम.एस्सी, एम.ए. अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया प्रारंभ

googlenewsNext

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा व संलग्नित महाविद्यालयातील एम.एस्सी., एम.ए. (भूगोल) प्रथम वर्ष या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विविध विषयांसाठी केंद्रीय पध्दतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून त्याचे माहितीपत्रक (ब्राऊचर) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

एम.एस्सी. / एम.ए. (भूगोल) प्रथम वर्षाच्या सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रीया ही केंद्रीय पध्दतीने दरवर्षी होत असते. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात किंवा महाविद्यालयांमध्ये न जाता त्यांना कोणत्याही ठिकाणाहून प्रवेशासाठी अर्ज करता यावा त्यांचा वेळ वाचावा, आर्थिक भूर्दंड बसू नये याचा विचार करता विद्यापीठ गेल्या दोन वर्षापासून एम.एस्सी., एम.ए. भूगोल प्रथम वर्षाच्या सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने राबवित आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती व नोंदणी अर्ज विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

४ डिसेंबरला होईल अंतिम गुणवत्ता यादी जाहीर
विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी अर्ज १७ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत भरता येतील. ऑनलाईन भरलेल्या अर्जांचे ई-व्हेरीफिकेशन १९ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येईल. प्रवेश नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर २ डिसेंबर रोजी तात्पुरती (प्रोव्हिजनल) गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर काही आक्षेप असल्यास ते ३ डिसेंबर पर्यंत नोंदवता येतील. अंतिम गुणवत्ता यादी ४ डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. प्रवेशासाठी पहिली, दुसरी, व तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी जाहीर केली जाणार आहे. ऑनलाईन अलॉटमेंटसाठी ऑप्शन फॉर्म भरतांना विद्यार्थ्यांनी कमीत कमी एक ऑप्शन भरणे बंधनकारक असून जेवढी महाविद्यालये आहेत तितके प्रेफरन्स विद्यार्थी भरू शकतो. केंद्रीय प्रवेश पध्दतीने ऑनलाईन अलॉटमेंट करण्यात येईल.

असे आहेत अर्ज स्वीकृती केंद्र
ई-व्हेरिफिकेशनसाठी ऑनलाईन भरलेले अर्ज माहिती पत्रकात दिलेल्या ई-मेलद्वारा ऑनलाईन विद्यार्थ्यांना पाठवावे लागणार आहे. तसेच विद्यापीठाने अर्ज स्वीकृती केंद्रांची यादी सुध्दा जाहीर केली आहे. त्यानुसार ऑनलाईन परीक्षा केंद्र, गणित प्रशाळा, कबचौउमवि, जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव., भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ., धनाजी नाना चौधरी कला व विज्ञान महाविद्यालय, फैजपूर., महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चोपडा., राष्ट्रीय स.शि.प्र.मंडळाचे य.ना. चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चाळीसगाव., एस.एस.व्ही.पी.एस.चे कै.पां.रा. घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे., आर.सी.पटेल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शिरपूर., सि.गो.पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, साक्री., जी.टी.पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदूरबार., पी.एस.जी.व्ही.पी.एस.कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा., कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर असे एकूण बारा केंद्र प्रवेश अर्ज स्विकृतीसाठी निश्चित करण्यात आलेले आहेत.

Web Title: M.Sc., M.A. Start the admission process of the course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.