शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

प्रशासकीय ‘आॅपरेशन’साठी हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 11:54 AM

डेथ आॅडिट कमिटी, टास्क फोर्सची निर्मिती : रुग्णाच्या मृत्यूची कारणमिमांसा होणार

जळगाव : कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या संपूर्ण देशभरात जळगावात सर्वाधिक आहे, हे वृत्त ‘लोकमत’ने आकडेवारीसह प्रसिध्द केल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी जळगावचा तातडीचा दौरा करून आरोग्य प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्यानंतर प्रशासनही कामाला लागले असून गुरुवारी लगेचच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी संशयित व्यक्तींच्या मृत्यूचे परिक्षण करण्यासाठी डेथ आॅडीट कमिटी तसेच टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या दोन्ही समित्यांवर खासगी डॉक्टर्सची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रशासकीय गलथानपणा, ढीसाळ नियोजन आणि केवळ काही ज्युनिअर डॉक्टर्सच्याच हातात दिलेली कोविड रुग्णालयाची धुरा यामुळे जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या देशभरात जास्त होती. कोरोना रुग्णाकडे कोविड रुग्णालयात कुणीच लक्ष पुरवत नाहीत. आॅक्सिजनपुरवठा संपला तरी तो बदलायला त्याठिकाणी कुणी हजर नसते, अशा गंभीर स्वरुपाच्या बाबी उघड झाल्या होत्या. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी तातडीचा दौरा केला.टास्क फोर्सअध्यक्ष -डॉ. सुनिल चौधरी, सदस्य डॉ. गौरव महाजन, डॉ. कल्पेश गांधी, डॉ. सुशिल गुजर, डॉ. अभय जोशी, डॉ. निलेश चांडक, डॉ. लीना पाटील,डॉ. पंकज बढे, डॉ. रविंद्र पाटील, डॉ. राहुल महाजन, सदस्य सचिव- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण.कार्य : कोरोनाची लक्षणे दिसून येत असलेल्या व गंभीर असलेल्या रुग्णांवर आवश्यक तो औषधोपचार करण्यासाठी सर्व संबंधित डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ यांना दररोज सल्ला देणे, मार्गदर्शन करणे. आवश्यकता भासल्यास डॉक्टर्स, स्टाफ यांची संख्या वाढवण्याबाबत मार्गदर्शन करणे. तसेच गंभीर रुग्ण असल्या त्याला जिल्ह्यातील उच्च प्रकारच्या वैद्यकीय उपचाराच्या सोयीसुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये किंवा अन्य जिल्ह्यात पाठवण्याची शिफारस करणे.डेथ आॅडिट कमिटीअध्यक्ष -डॉ. दीपक पाटील, सदस्य किरण मुठे,डॉ. धीरज चौधरी, डॉ. चंद्रय्या कांते, सदस्य सचिव- डॉ. विजय गायकवाड.कार्य : मयत व्यक्तींच्या केसपेपरचे परिक्षण करून त्या व्यक्तीवर आकरण्यात आलेल्या वैद्यकीय उपचाराबाबत माहिती घेऊन निष्कर्ष काढणे, मयत व्यक्तीस यापूर्वी कोणते आजार होते का? कोणती नियमित औषधे सुरु होते, याबाबत नातेवाईकांशी संपर्क साधून खात्री करणे, उपचार करत असताना कोणत्यावेळी उणिवा जाणवल्या. ज्यामुळे त्या रुग्णाचा मृत्यू झाला.कोविडसाठी खाजगी हॉस्पिटल अधिग्रहीतशहरातील गोल्ड सिटी हॉस्पिटल कोविड रुग्णालय म्हणून अधिग्रहीत करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी गुरुवारी काढले आहेत. या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील १० आयसीयु बेडस सहीत एकूण ५० बेडस् व या हॉस्पिटलचा सर्व मेडिकल व पॅरामेडिकल स्टाफसह सर्व सुविधा ०५ जूनपासून पुढील आदेश येईपर्यंत अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.‘लोकमत’ने केला पर्दाफाशजळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर हा देशभरात सर्वाधिक असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रसिध्द केली. एवढेच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञ अन् प्रत्यक्षात रुग्णालयात काम केलेल्या डॉक्टर्स तसेच रुग्णांशी बोलून तेथील कारभाराची पोलखोल केली होती. त्यामुळे हा विषय राज्य शासनापर्यंत गेला. डेथ आॅडिट कमिटीने आपला अहवाल आठ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावयाचा असून या समितीस आवश्यकतेप्रमाणे लागणारे मनुष्यबळ पुरवणे, सर्व प्रकारची प्रशासकीय मदत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.२४ ते ४८ तासात मिळणार अहवालजळगावात कोरोना विषाणूच्या रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा कार्यान्वित असल्यामुळे किमान २४ तासांत रुग्णांचे तपासणी अहवाल मिळालेच पाहिजेत, असे सक्त निर्देश आरोग्य मंत्र्यांनी बुधवारी दिले होते़ त्यानुसार प्रयोगशाळा अधिकाºयांना २४ तासात किंवा अधिकाअधिक ४८ तासात अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आली असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांनी ‘लोकमत’ दिली़देशाच्या तुलनेत जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर अधिक असल्याची बाब ‘लोकमत’ने ठळकपणे समोर आणली होती़ ही बाब समोर येताच बुधवारी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व आवश्यक सूचना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जिल्हा दौºयावर आले होते़ दरम्यान, संशयित रूग्णांचे स्वॅब घेतल्यानंतर तपासणी अहवाल उशिरा प्राप्त होत असल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी अहवाल चोवीस तासात देण्याचे निर्देश संबंधित अधिकाºयांना दिले आहेत़ त्यानुसार प्रयोगशाळेतील तात्काळ अहवाल द्यावेत, अशा सूचना अधिष्ठाता खैरे यांनी केल्या आहेत़नवीन जाहिरात काढणाररिक्त पदे स्थानिक पातळीवर भरण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी केल्या आहे़ त्यामुळे आता पुन्हा नव्याने या रिक्त जागांसाठी लवकरच जाहीरात काढली जाणार आहे, अशी माहिती खैरे यांनी दिली़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव