दिव्यांगांचे काळ्या फिती लावून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST2020-12-04T04:46:59+5:302020-12-04T04:46:59+5:30
——- डेंग्यूचा त्रास मुक्ताईनगर : कोरोनाचे संकट काहीसे कमी झाले. तरीही प्रशासनाकडून खबरदारी बाळगली जात आहे. मात्र शहरात ...

दिव्यांगांचे काळ्या फिती लावून आंदोलन
——-
डेंग्यूचा त्रास
मुक्ताईनगर : कोरोनाचे संकट काहीसे कमी झाले. तरीही प्रशासनाकडून खबरदारी बाळगली जात आहे. मात्र शहरात आता डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. या दुसऱ्या संकटामुळे भीतीचे वातावरण आहे. नगर परिषद प्रशासनाने याविरुद्ध जनजागृती करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
——
माेबाइल चोरीत वाढ
धरणगाव : येथील आठवडे बाजार हा गुरुवारी भरत असतो. याच दिवशी चोरट्यांनी दोन जणांचे मोबाइल चोरून नेल्याच्या घटना घडल्या. गुरुवारी बाजारानिमित्ताने येथे गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे हात साफ करत असतात. बाजार पट्ट्यात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
——-
अपंग दिन साजरा
धरणगाव : दिव्यांग सल्ला व मार्गदर्शक केंद्रात अंग दिन साजरा झाला. गट शिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. दिव्यांग लाभार्थी बांधवांना स्वावलंबन कार्ड वाटप करण्यात आले. कक्ष परीक्षक किशोर पाटील, ऋषीकेश पाटील, वाल्मीक पाटील, आर. एस. पाटील, अनंत जाधव उपस्थित होते.
——-
बसेसमध्ये गर्दी
पारोळा : रेल्वेच्या गाड्या फारशा धावत नसल्यामुळे बसेसमध्ये वाढती गर्दी दिसत आहे. बस प्रशासनाने हे लक्षात घेऊन बसेसची संख्या मुख्य मार्गांवर वाढविण्याची गरज आहे. मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव अशा बसेसची संख्या वाढवली जावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.
——
गटारी तयार करा
भुसावळ : शहरातील विविध भागांत नागरी सुविधांचा अद्यापही अभाव आहे. खडका चौफुलीजवळील आयान काॅलनी, जिया काॅलनी भागात अद्यापही गटारींची कामे झालेली नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वहात असते. वाहने येता-जाताना हे पाणी नागरिकांच्या अंगावर उडून वाद होत असतात.
—-
वाळू चोरी सुरूच
जळगाव : गिरणा पात्रातून वाळू चोरीचे प्रमाण हे वाढते आहे. तालुक्यातील निमखेडी शिवारातून मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, डंपर वाळू घेऊन धावत असतात. नजीकच्या शेतांमधून काही वाहने रस्त्यावर येतात. याची गंभीर दखल घेतली जावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.