बाहुटे येथे लग्न सोहळ््यात शोककळा : कार उलटून एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:28 IST2019-03-30T23:28:17+5:302019-03-30T23:28:38+5:30

दोन जण जखमी

A mourning in the wedding ceremony at Bahutay: One person killed after car hit | बाहुटे येथे लग्न सोहळ््यात शोककळा : कार उलटून एक जण ठार

बाहुटे येथे लग्न सोहळ््यात शोककळा : कार उलटून एक जण ठार

पारोळा : बाहुटे येथे लग्न सोहळ््यासाठी आलेल्या कारचे टायर फुटून ती उलटल्याने झालेल्या अपघातात प्रमोद मधुकर पाटील (३२, रा. पिसावद, ता.शहादा ह.मु.सुरत) हे जागीच ठार झाले तर इतर दोन जण जखमी झाले. हा अपघात ३० मार्च रोजी दुपारी १२.४५ वाजता बाभळेनाग फाट्यानजीक
या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील बाहुटे येथे शनिवारी विनोद दोधा पाटील यांच्याकडे लग्न होते. या सोबतच सोमवारी प्रभाकर हिलाल पाटील यांच्याकडेही लग्न असल्याने या दोघी लग्नाला जाऊन नातेवाईकांशी भेटीगाठी घेऊन परत येऊ, या उद्देशाने शनिवारी पहाटे प्रमोद मधुकर पाटील हे त्यांच्या कारने (जी.जे-०५, जे.एन.६४३२) बाहुटे येथे येण्यास निघाले. त्या वेळी प्रकाश मांगीलाल पाटील (रा.शिरूड ता.मालेगाव) यांनाही त्यांनी सोबत घेत बाहुटे येथे लग्नासाठी दुपारी ११.३० वाजता आले.
तेथून प्रमोद पाटील यांच्यासह प्रभाकर हिलाल पाटील (बाहुटे), प्रकाश पाटील हे तिघे जण कारने पारोळा येथे चहापानसाठी आले होते. तेथून परत बाहुट्याकडे जात असताना महामार्गावरील मुंजोबा मंदिराजवळील बाभळेनाग फाट्यानजीक कारचे टायर फुटले व कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उलटून खड्यात जाऊन पडली. त्यात कारचालक प्रमोद मधुकर पाटील यांना जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले तर प्रभाकर पाटील व प्रकाश पाटील हे जबर जखमी झाले. या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली.

Web Title: A mourning in the wedding ceremony at Bahutay: One person killed after car hit

टॅग्स :Jalgaonजळगाव