मातेला मुलांनी केले निराधार, मुलीने दिला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 09:30 PM2019-12-13T21:30:09+5:302019-12-13T22:30:35+5:30

वयाच्या ७४ व्या वर्षी रस्त्यावर फिरण्याची वेळ : कोचूर येथील दोघे धावले मदतीला

The mothers have given their children baseless, girl support | मातेला मुलांनी केले निराधार, मुलीने दिला आधार

मातेला मुलांनी केले निराधार, मुलीने दिला आधार

Next


सावदा, ता. रावेर : मुक्ताईनगर तालुक्यातील लोहारखेडा येथील  ७४ वर्षीय वृद्धेला तिच्या दोन्ही मुलांनी वाऱ्यावर सोडले. यामुळे हताशपणे फिरणाºया या वृद्धेला कोचूर येथील कमलाकर पाटील व पंकज पाटील यांनी थोडा आधार देत सावरले. चौकशी अंती मुलांनी आईला सांभाळण्यास ठामपणे नकारच दिला. यानंतर वृद्धेने सांगितल्यानुसर तिच्या मुलीशी संपर्क साधला असता मुलीने मात्र आपल्या आईला आपल्या घरी नेले. मुलांनी नाकारले अखेर मुलींनी स्विकारले अशी ही घटना असून ‘त्या’ निर्दयी मुलांबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला.
या घटनेबाबत वृत्त असे की, येथील कोचूर रोडवर एक वयोवृद्ध महिला हताशपणे दिसली असता कोचुर येथील कमलाकर पाटील व पंकज पाटील यांनी चौकशी केली असता तिने सांगितले की, आपल्याकडे शेतीवाडी असून दोन मुले आहेत  माझ्या या मुलांनी मला घराबाहेर काढले आहे, ही सर्व त्यांची कैफियत ऐकून कमलाकर व पंकज पाटील यांनी लागलीच लोहारखेडा येथे संपर्क साधून वृद्धेच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांच्या मुलांनी आईला सांभाळण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे या वृद्धेला रडू कोसळले. तिला सावरतााटीलद्वयींनी खायला देत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार आजीला सावदा पोलिस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्याकडे घेऊन गेले. पोलिसांनीही संपर्क साधला असता त्या दोन्ही मुलांनी तेच उत्तर दिले. यामुळे सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार व कोचुर येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील व पंकज पाटील या सर्वांचे मन अगदी सुन्न झाले. यानंतर आजीबाईंना जळगाव येथील वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र तोच आजीबाईने आपल्या मुलीचे नाव सांगत मला माझ्या मुलीकडे सोडून द्या अशी विनवणी केली त्यानुसार मोहराळा तालुका यावल येथे मुलीला फोन लावला असता मुलगी सावदा येथे येऊन आपल्या आईला सोबत घेऊन गेली.
दरम्यान आजीबाईला जेवण देत तिच्यासाठी प्रयत्न करीत मानवतेचे दर्शन घडवण्याचं काम कोचुर येथील कमलाकर पाटील व पंकज पाटील यांनी केले. यासाठी त्यांना पोलिसांचेही सहकार्य लाभले.

Web Title: The mothers have given their children baseless, girl support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.