मुलाच्या तिसऱ्यावर आईने सोडले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:04 PM2020-04-22T17:04:27+5:302020-04-22T17:05:31+5:30

मुलाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पुत्र शोकाने व्यथित झालेल्या मातेने मुलाच्या तिसºयाच्या विधीच्या दिवशीच प्राण सोडले.

The mother gave up her life on the third of the child | मुलाच्या तिसऱ्यावर आईने सोडले प्राण

मुलाच्या तिसऱ्यावर आईने सोडले प्राण

Next
ठळक मुद्देनिंभोरा येथील हृदय हेलावणारी घटनामुलाचा अपघातात झाला होता मृत्यू

निंभोरा बुद्रूक, ता.रावेर, जि.जळगाव : येथील रहिवाशी असलेल्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पुत्र शोकाने व्यथित झालेल्या मातेने मुलाच्या तिसºयाच्या विधीच्या दिवशीच प्राण सोडले. मंगला भास्कर महाले (वय ५५) असे या मातेचे नाव आहे. हृदय हेलावणाºया या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ज्येष्ठ पत्रकार तथा निंभोरा ग्रा.पं.चे माजी भास्कर दौलत महाले यांच्या परिवारावर नियतीने घाला घातला. २० रोजी त्यांचा लहान मुलगा सुधीर भास्कर महाले (वय ३४) याचा धानोºयाजवळ कार अपघातात मृत्यू झाला. त्याच्यावर दि.२१ रोजी निंभोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाच्या चितेची अग्नी अजून शांत होते न होते तोवर नियतीने घात करून मुलाच्या तिसºया दिनीच पुत्र शोकात आई मंगला भास्कर महाले (वय ५५) यांनीही २२ रोजी दुपारी बाराला प्राण सोडला. ही वार्ता कळताच मोठा मुलगा संदीप महाले याने हंबरडा फोडला. त्यात तो बेशुद्ध पडला. त्यांच्यावर २२ रोजी दुपारी चारला निंभोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या ज्येष्ठ पत्रकार भास्कर दौलत महाले यांच्या पत्नी होत.
 

Web Title: The mother gave up her life on the third of the child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.