आई, वडील आजारी सांगून ठेवल्या चोरीच्या दुचाकी गहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:20 IST2021-08-26T04:20:36+5:302021-08-26T04:20:36+5:30
मुकुंदा डिगंबर सुरवाडे हा दुचाकी चोरीत अट्टल असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. दोन वर्षापासून तो फरार होता. भुसावळात दर ...

आई, वडील आजारी सांगून ठेवल्या चोरीच्या दुचाकी गहाण
मुकुंदा डिगंबर सुरवाडे हा दुचाकी चोरीत अट्टल असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. दोन वर्षापासून तो फरार होता. भुसावळात दर सहा महिन्यांनी तो राहण्याचे घर बदल करीत होता, त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तो भुसावळ शहरात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक फौजदार अशोक महाजन, महेश महाजन, ललिता सोनवणे, किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख, अविनाश देवरे, रणजीत जाधव, विनोद पाटील, उमेशगिरी गोसावी, हरिश परदेशी, वहिदा तडवी, विजय चौधरी व अशोक पाटील यांचे पथक भुसावळला रवाना केले होते. या पथकाने सुरवाडे याला अटक तर केलीच शिवाय त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकीदेखील हस्तगत केल्या. त्याने या दुचाकी जळगाव, भुसावळ, कासोदा येथून चोरी केलेल्या आहेत.