आई भवानी तुझ्या कृपेने़...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 06:37 PM2020-01-30T18:37:53+5:302020-01-30T18:37:59+5:30

‘उडान’ स्रेहसंमेलन : हिंदी, मराठी, अहिराणी गाण्यांवर थिरकली तरूणाई

 Mother Bhavani by your grace ... | आई भवानी तुझ्या कृपेने़...

आई भवानी तुझ्या कृपेने़...

Next

जळगाव- आई भवानी तुझ्या कृपेने़...पहिली बार है जी... ये इतना जरूरी कैसे हुआ...ओ लडकी आंख मारे... अशा हिंदी, मराठी गाण्यांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्याविष्कार करून उपस्थित प्रक्षेकांकडून वन्समोअरची दाद मिळवून घेतली. निमित्त होते ते नुतन मराठा महाविद्यालयातील ‘उडान’ वार्षिक स्रेहसंमेलनाचे.

शहरातील नुतन मराठा महाविद्यालयाच्या ‘उडान’ स्रेहसंमलनाचे गुरूवारी मोठ्या जल्लोषात उद्घाटन झाले़ यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून आयएनआयएफडी संस्थेच्या संचालिका संगिता पाटील, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक अकबर पटेल, संमेलनप्रमुख प्रा.डॉ.डी.एल.पाटील, तिन्ही उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.जी.पाटील, डॉ.एस.ए.गायकवाड, प्रा.डॉ.आर.बी.देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने झाली.

जीवनात शिस्तपालक व मूल्यविवेक जपणे महत्वाचे
जीवनात मनसोक्तपणे जगत असताना शिस्तपालन करणे व मूल्यविवेक जपणेदेखील महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा पेठ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी मार्गदर्शन करताना केले़ त्यानंतर यावेळी महाविद्यालयाचे हलगी सम्राट नाटक दाखविण्यात आले. नाटकातील सागर भंडगर याची निवड झाल्याबद्दल मानव्यरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला़

वाय-फाय सुविधेचे अनावरण
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाय-फाय सेवा सुविधेचे अनावरण करण्यात आले. त्याप्रसंगी प्राचार्य डॉ.देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन उकृष्ट व्यासपीठ असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन व प्रस्तावना प्रा.डॉ.अशफाक शेख यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ.आर.बी.देखमुख यांनी मानले.

सांस्कृतीक कार्यक्रमांनी आणली रंगत
उद्घाटनानंतर दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. सुरुवातीला एकल, समुह व शास्त्रीय गायन घेण्यात आले. यात गणेशवंदना सुुरुवात करत मराठी, हिंदी सिनेमाची गिते, विविध लोकगिते, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ओव्या सादर झाल्या. खंडरायाच्या लग्नाला... क्या हुआ तेरा वादा... चांदण झाली रात... वाढीव दिसतय राव... यासह मराठी अहिराणी रिमिक्स गितांनी उपस्थितांची मने जिंकत टाळ्याचा प्रतिसाद मिळविला.
यानंतर समुह, एकल नृत्य सादर झाले. यात आई भवानी तुज्या कृपेने...पहिली बार है जी... ये इतना जरुरी कैसे हुआ... ओ लडकी आंख मारे... या गितांवरील नृत्यांनी वन्समोअर मिळवत विद्यार्थ्यांना फिरकायला भाग पाडले. योगेश पवार याने योगा नृत्य करीत वाहवा मिळवली. मुकेश सावकारे याने एकपात्री नाटक सादर केले. तसेच आदिवासी समाजातील गिताचे समुह नृत्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

शुक्रवारीसमारोप
महाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी १० वाजता वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध परीक्षांमधील गुणवंत तसेच पीएच.डी धारक शिक्षक, स्नेहसंमेलनातील विविध स्पर्धांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, महिला व बालकल्याण अधिकारी व्ही.आय.परदेशी यांची उपस्थिती राहील.

 

Web Title:  Mother Bhavani by your grace ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.