आई व भावाने केला तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:50 IST2019-03-06T23:50:02+5:302019-03-06T23:50:17+5:30

झाडी येथील घटनेचा तपास

Mother and brother committed the murder of the youth | आई व भावाने केला तरुणाचा खून

आई व भावाने केला तरुणाचा खून

अमळनेर : आई आणि भावाचे जगणे कठीण केल्यानेच झाडी येथील सुनील पाटील यांचा आई व भावाने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. मारवड पोलिसांनी आई व भावाला अटक केली आहे
झाडी ता.अमळनेर येथील सुनील सुभाष पाटील या युवकाचा २२ फेब्रुवारी रोजी रात्री खून झाला होता. त्यानंतर मारवड पोलीस ठाण्या अंतर्गत अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र सदर जागेत कुठलेही ठोस पुरावे न सापडल्याने आरोपी शोधने पोलिसांसमोर आव्हान ठरले होते. मात्र नातेवाईकांच्या संदिग्ध जबाबमुळे संशयाची सुई आई व भावाकडे वळली होती.
सुनील हा दारू पिऊन आई भावाला शिवीगाळ करीत पैसे मागत असे. पैसे न दिल्यास घरातील वस्तू तोडफोड करीत आई व भावावर हल्ला करीत असे. चांगल्या मुलाचा संसार त्याच्याकडून उद्ध्वस्त होण्यापेक्षा त्यालाच संपवण्याचा निर्णय मायलेकांनी घेतला आणि २२ रोजी रात्री तो शेतात झोपलेला असताना त्यांच्या डोक्यावर शस्राने वार करून त्याचा खून केला होता. मयताचा भाऊ गणेश पाटील व आई संगीता पाटील यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गणेश याला ११ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Mother and brother committed the murder of the youth

टॅग्स :Jalgaonजळगाव