सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:18 IST2021-07-30T04:18:29+5:302021-07-30T04:18:29+5:30
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातून आठ गाई नेताना एकास अटक सहस्त्रलिंग ते लालमाती दरम्यानच्या वनक्षेत्रातील घटना रावेर : सातपुड्यातील लालमाती ...

सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातून
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातून आठ गाई नेताना एकास अटक
सहस्त्रलिंग ते लालमाती दरम्यानच्या वनक्षेत्रातील घटना
रावेर : सातपुड्यातील लालमाती ते सहस्त्रलिंग दरम्यान असलेल्या अतिदुर्गम भागातील वनक्षेत्रातून ८ गायी पायी रस्त्याने निर्दयीपणे जोरजोरात काठीने मारझोड करून यावल तालुक्यातील मारूळ येथे एकास पोलिसांनी अटक केली आहे.
तीन जण या गायी नेत होते. पैकी एकाच्या पाल औटपोस्टच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून दोन जण फरार झाले आहेत. ७० हजार रूपये किमतीच्या आठ गाई जप्त करण्याची धडक कारवाई २८ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील मोहगण परिसरातून आणलेल्या काळ्या व लाल रंगांच्या १ ते ३ वर्षे वयोगटातील ८ गाई यावल तालुक्यातील मारूळ येथे अवैध पणे नेत असता ना ही कारवाई केली. यात रावेर पोलिसांनी पाठलाग करून आरोपी कुर्बान मुजाहीद तडवी (वय २४) रा.मारूळ ता.यावल यास अटक केली असून घटनास्थळावरून मजीत गबू तडवी तथा फिरोज गुलजार तडवी दोन्ही रा.आभोडा बु।।ता.रावेर हे पसार झाले.
रावेर स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाल औट पोस्टचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र राठोड, पो.कॉ. संदीप धनगर, पो.कॉ. नरेंद्र बाविस्कर, पो.कॉ. दीपक ठाकूर व पो.कॉ. प्रदीप सपकाळे यांच्या पथकाने सापळा रचून ही धडक कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भात पोकॉ दीपक मगन ठाकूर यांनी दिलेले फिर्यादीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारित २०१५ चे कलम ५,(ब),९, ११ (अ),(ड),(ह) प्रमाणे रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीची एक दिवसांची पोलीस कोठडी संपुष्टात आली आहे.
सातपुड्यातील अतिदुर्गम भागात केलेल्या या धडक कारवाईतील आठही गायी व वारसांना जळगाव नजीकच्या कुसुंबा येथील बाफना गोशाळेत रवाना केले आहे.