शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रावेर वनक्षेत्रात सर्वाधिक प्राण्यांची नोंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 17:02 IST

यावल वनविभागातील सात वनपरिक्षेत्रापैकी रावेरमध्ये सर्वाधिक प्राण्यांची नोंद झाली आहे. या वनक्षेत्रात वाघ, बिबट्यासह अनेकांनी दर्शन दिल्याने वन्यप्रेमींना मोठा आनंद घेता आला आहे.

कुंदन पाटील

जळगाव : यावल वनविभागातील सात वनपरिक्षेत्रापैकी रावेरमध्ये सर्वाधिक प्राण्यांची नोंद झाली आहे. या वनक्षेत्रात वाघ, बिबट्यासह अनेकांनी दर्शन दिल्याने वन्यप्रेमींना मोठा आनंद घेता आला आहे.

यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या नेतृत्वाखाली बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पर्यटकांना वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्याचा आनंद घेण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यासाठी  चोपडा वनक्षेत्रात ३., वैजापूरला ७, अडावद ४, देवझिरी ४, यावल पूर्वमध्ये ७, पश्चिममध्ये ६ तर रावेर वनक्षेत्रात १२ अशा ४२ मचाण उभारण्यात आल्या होत्या. बुध्द पौर्णिमेला सायंकाळी ५ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यात आली.

यात पर्यटकांना वाघ आणि बिबट्यांसह, अस्वल, कोल्हा, तरस, निलगाय, चिकारा, चितळ, भेकर, सायाळ, रानडुक्कर, माकळ, मोर, घुबळ, सर्पगरुड, रातवा, कापशी घार, धामणसाप, घोणस, मन्यार, रानमांजर, ससा, मोर आदी वन्यप्राण्यांचे मनसोक्त दर्शन घेता आले. चिंचाटी धरणावरील अंजन मचानीवर असलेले वन्यजीप्रेमी अर्जुन ठाकुर, वनरक्षक राजु बोंडल यांना वाघाचे दर्शन झाले. रावेर वनक्षेत्रातील गारबर्डी, लोहारा, कुसुंबा या सफारी क्षेत्रात ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. या मोहिमेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, रेल्वेच्या डीआरएम इति पांडे, फैजपूरच्या प्रांताधिकारी तथा परिविक्षाधीन जिल्हाधिकारी देवयानी  यादव यांनीही सहभाग घेतला होता.

वनक्षेत्रनिहाय प्राण्यांची नोंदचोपडा: २७वैजापूर :५८अडावद : २२देवझिरी : ३४यावल पूर्व: ७८यावल पश्चिम : ६४रावेर :  ३०१एकूण : ५८४कोटयावल वन विभागात गेल्या दोन वर्षापासुन सातपुडा परिसरात वन्यप्राण्यांकरीता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने कामे करण्यात आलेली आहे. त्यामुळे सातपुडा परिसरात जैविक विविधता निर्माण झालेली आहे व वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. -जमीर एम.शेख, उपवनसंरक्षक.

टॅग्स :Jalgaonजळगाव