शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखाहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 23:08 IST

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ८८.८१ टक्के : मृत्यूदर आला १.७७ टक्क्यांपर्यत खाली जळगाव :  जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या ...

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ८८.८१ टक्के : मृत्यूदर आला १.७७ टक्क्यांपर्यत खाली

जळगाव :  जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात  कोरोनामुळे बाधित झालेल्या एक लाख १३ हजार ७०४ रुग्णांपैकी १ लाख ७५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  रुग्ण बरे होण्याचे हे  प्रमाण ८८.६१ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्यूदर १.७७  टक्क्यांपर्यत खाली आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. 

दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरही १० टक्क्यांपर्यत खालीजिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्ण शोध मोहिमेतंर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्यांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून वेळेवर उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय मृत्यूदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाख ५१ हजार ४७३ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी १ लाख १३ हजार ७०४ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर ७ लाख ३७ हजार ९८७ अहवाल निगेटिव्ह आले आहे. सध्या अवघे ११२ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरही १० टक्क्यांपर्यत खाली आला आहे. जिल्ह्यात ६ हजार ३२५ व्यक्ति होम क्वारंटाईन असून ६७० व्यक्ति विलगीकरण कक्षात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १० हजार ९३० रुग्णांपैकी ७ हजार  ५३१ रुग्ण लक्षणे नसलेले तर ३ हजार ३९९ रुग्ण हे लक्षणेध असलेली आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. 

तालुकानिहाय कोरोना स्थितीतालुका - उपचार घेत असलेले रुग्ण - बरे झालेले रुग्ण - एकूण मृत्यूजळगाव शहर- २१९८ - २६३५८ - ४७९ जळगाव ग्रामीण-३९१- ३९६२-१०९ भुसावळ-१२३६-८४४४-२७६ अमळनेर-४९५-६९५५-१२८ चोपडा-८७७-११५७७-१४७ पाचोरा- ४४०-३१४६-९८भडगाव-१८८-२९२८-५६धरणगाव-४४७-४१५४-९४यावल- ४७१-३१६९-१०३एरंडोल-६२७-४६३१-७७जामनेर-८५७-६३१९-१०६रावेर-९२०-३५२८-१३२पारोळा-३०६-३७३६-३४ चाळीसगाव-४३२-६३११-१०१मुक्ताईनगर-६३७-३०३०-४९ बोदवड-३०३-१७४३-२७ इतर जिल्ह्यातील -१०५-७६७- -- एकूण - १०९३०-१००७५८-२०१६

टॅग्स :Jalgaonजळगाव