नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक, ६१० रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 13:18 IST2020-08-30T13:17:56+5:302020-08-30T13:18:49+5:30
जळगाव जिल्ह्यात ७० टक्के रुग्ण झाले बरे

नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक, ६१० रुग्णांची कोरोनावर मात
जळगाव : शनिवारी जिल्ह्यात कोरोनाचे नवे ५६६ रुग्ण आढळून आले तर ६१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़ नवीन रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक असल्याने उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी म्हणजे ६९४३ झाली आहे़ दरम्यान, शनिवारी ९ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
शनिवारी २२८८ अहवाल समोर आले. यात १६६२ निगेटीव्ह आहेत़ बरे होणाऱ्यांची संख्या १८६९८ झाली असून बरे होणाºयांचे प्रमाण अखेर ७० टक्के झाले आहे़ जिल्ह्यात शनिवारी पुन्हा एकदा जळगाव शहरात सर्वाधिक १४३ रुग्ण आढळले आहेत़