त्या २० कि.मी.च्या रस्त्यावर ७० पेक्षा अधिक अतिक्रमणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST2021-09-14T04:20:33+5:302021-09-14T04:20:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झालेल्या शहरातील २० कि.मी.च्या त्या ६ रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांना मनपाने अतिक्रमण ...

More than 70 crossings on that 20 km road | त्या २० कि.मी.च्या रस्त्यावर ७० पेक्षा अधिक अतिक्रमणे

त्या २० कि.मी.च्या रस्त्यावर ७० पेक्षा अधिक अतिक्रमणे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झालेल्या शहरातील २० कि.मी.च्या त्या ६ रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांना मनपाने अतिक्रमण काढून घेण्यासाठी तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून न घेतल्यास मनपाकडून ते अतिक्रमण काढण्यात येईल, असा इशारा मनपाकडून देण्यात आला आहे.

शहरातील २० कि.मी.च्या ६ रस्त्यांचा विषय ‘लोकमत’ने लावून घेतल्यानंतर शासनाच्या अंदाज समितीच्या व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय चांगलाच गाजला होता. शासन निर्णयानुसार हे ६ रस्ते मनपाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनपाने या रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली होती. गेल्या आठवड्यात महापालिकेचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली होती. पाहणीदरम्यान शहरातून गेलेल्या ६ रस्त्यांवर ७० पेक्षा अधिक पक्के व किरकोळ अतिक्रमणे आढळून आली आहेत. निमखेडी ते शिवाजीनगर टाॅवर चौक ते काव्यरत्नावली चौक असोदा रेल्वे गेट ते टॉवर चौक अजिंठा चौफुली ते कुसुंबा नाका व इच्छादेवी चौक ते रायसोनी कॉलेज यादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोजणी, तसेच अतिक्रमणांची नोंद मनपाने केली असून, तीन दिवसांत अतिक्रमणधारकांनी हे अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्याचा सूचना मनपाकडून देण्यात आल्या आहेत, तसेच मनपाकडून शहरात गणेश विसर्जनानंतर या सर्व मार्गांवर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Web Title: More than 70 crossings on that 20 km road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.