माकडाने तोडला रुग्णवाहिका चालकाच्या पायाचा लचका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:47 IST2018-11-16T12:47:00+5:302018-11-16T12:47:16+5:30

जिल्हा रुग्णालयात उपचार

Monkey's ammunition driver's footrest | माकडाने तोडला रुग्णवाहिका चालकाच्या पायाचा लचका

माकडाने तोडला रुग्णवाहिका चालकाच्या पायाचा लचका

जळगाव : रुग्णालयातून बाहेर पडत असताना अचानक माकडाने हल्ला करीत आतिष शांतीलाल चांगरे (४२, रा. पाचोरा) या रुग्णवाहिका चालकाच्या उजव्या पायाचा लचका तोडला. यात चांगरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुुरुवारी दुपारी घडली.
आतिष चांगरे हे पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कामाला असून गुरुवारी ते पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालयातून बाहेर पडत असताना माकडाने त्यांच्यावर हल्ला केला. यात चांगरे यांच्या उडव्या पायाचा माकडाने लचका तोडला. त्यांच्यावर पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णलयात हलविण्यात आले.

Web Title: Monkey's ammunition driver's footrest