अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू : शेतकऱ्यांनी केले अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 22:51 IST2020-10-13T22:51:12+5:302020-10-13T22:51:27+5:30
अन्य एक वानर जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू : शेतकऱ्यांनी केले अंत्यसंस्कार
बोदवड : अपघातात ठार झालेल्या वानरावर येथील शेतकऱ्यांनी अंत्यसंकार केले. तर दुसऱ्या जखमी वानरावर उपचार करीत प्राणीदयेचे दर्शन घडिवले.
याबाबत वृत्त असे की, मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बोदवड -जामठी रस्त्यावर बोदवड पासून दोन किमी अंतरावर दोन वानर हे रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात एक वानर जागीच ठार झाले तर एक गंभीर अवस्थेत विव्हळत असताना बाजूच्या शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली गंभीर असलेल्या वानराला पाणी पाजत वन्यविभागाला माहिती दिली व पशु वैदकीय अधिकारीऱ्यांकडे उपचासाठी नेले.
यानंतर रस्त्यात मृत्यूमुखी पडलेल्या वानराला शेतकरी दिलीप घुले, हर्षल बडगुजर,आदेश गिल, कैलास बडगुजर आदी शेतकऱ्यांनी त्याच्या शेताच्या बाजूला खड्डा खोदत लाल कापड,फुले आणून अंत्यसंस्कार केले. दरम्यान, जखमी माकडावर उपचार करून साळशिंगी येथील वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत संबंधित शेतकऱ्यांचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे.