सोमवारी विभागीय लोकशाही दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST2021-09-09T04:21:47+5:302021-09-09T04:21:47+5:30
२१ सप्टेंबरला पेन्शन अदालत जळगाव : डाक विभागातर्फे सेवानिवृत्त झालेल्या डाक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयी तक्रारी समजून घेण्यासाठी डाक अधीक्षक, जळगाव ...

सोमवारी विभागीय लोकशाही दिवस
२१ सप्टेंबरला पेन्शन अदालत
जळगाव : डाक विभागातर्फे सेवानिवृत्त झालेल्या डाक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयी तक्रारी समजून घेण्यासाठी डाक अधीक्षक, जळगाव विभाग, जळगाव यांचे कार्यालयात २१ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.
जळगाव डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयीच्या ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या पेन्शन अदालतमध्ये दखल घेतली जाईल, असे आवाहन अधीक्षक डाकघर डॉ. बी. एच. नागरगोजे यांनी केले आहे.
चौथी राष्ट्रीय हातमाग गणना विणकरांनी संपर्क साधण्याचे आवाहन
जळगाव : चौथी राष्ट्रीय हातमाग गणनेचे काम महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्ण झाले आहे. तथापि, या हातमाग गणनेतून सुटलेले, अनवधानाने राहिलेले हातमाग विणकरांना समाविष्ट करण्यासाठी सर्व हातमाग विणकर तसेच संलग्न विणकर, मजूर यांना अंतिम संधी देण्यात येत आहे. ज्या विणकरांचा समावेश हातमाग गणनेत झालेला नसेल, त्यांनी जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.