एरंडोल नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मोमीन अब्दुल शकूर बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 23:00 IST2018-09-11T22:58:01+5:302018-09-11T23:00:25+5:30

उपनगराध्यक्षपदासाठी मोमीन अब्दुल शकूर अ.लतीफ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Momin Abdul Shakoor unanimously elected as Vice President of Erandol Municipality | एरंडोल नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मोमीन अब्दुल शकूर बिनविरोध

एरंडोल नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मोमीन अब्दुल शकूर बिनविरोध

ठळक मुद्देउपनगराध्यक्षा छाया दाभाडे यांनी दिला होता राजीनामारिक्त पदासाठी झाली विशेष सभाएकमेव अर्ज आल्याने झाली बिनविरोध निवड

एरंडोल : उपनगराध्यक्षा छाया दाभाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदासाठी १० सप्टेंबर रोजी नगरपालिकेची विशेष सभा घेण्यात आली. पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार अर्चना खेतमालीस यांनी काम पाहिले. उपनगराध्यक्षपदासाठी मोमीन अब्दुल शकूर अ.लतीफ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश मुकूंदसिंग परदेशी व तहसीलदार अर्चना खेतमालीस यांनी त्यांचे स्वागत केले. या विशेष सभेला २३ नगरसेवकांपैकी १५ नगरसेवक उपस्थित होते. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष मोमीन अब्दुल शकूर अ.लतीफ यांचे असलम पिंजारी यांनी स्वागत केले.
मुख्याधिकारी किरण देशमुख, नायब तहसीलदार आबा संजय ढमाळ यांनी सहकार्य केले. न.पा.च्या सर्व कामांमध्ये भाजपाचे विभागीय संघटन मंत्री अ‍ॅड.किशोर काळकर, उपनगराध्यक्ष मोमीन अब्दुल शकूर अ.लतीफ, सर्व नगरसेवक, नगरसेविका, शहरातील नागरिक व न.पा.कर्मचारी यांचे सहकार्य लाभत असल्याने विकास कामांचा रथ पुढे नेणे शक्य होत असल्याचे नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी केला आहे.

Web Title: Momin Abdul Shakoor unanimously elected as Vice President of Erandol Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.