पाचोरा येथे महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 23:35 IST2019-07-19T23:33:12+5:302019-07-19T23:35:14+5:30

वारंवार भांडणे करीत महिलेस मारहाण करून लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून शिक्षक दाम्पत्यासह त्यांच्या मुलाविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Molestation of a woman at Pachora | पाचोरा येथे महिलेचा विनयभंग

पाचोरा येथे महिलेचा विनयभंग

ठळक मुद्देशिक्षक दाम्पत्यास मुलासह अटकबऱ्याच दिवसांपासून सुरू होते भांडण

पाचोरा, जि.जळगाव : वारंवार भांडणे करीत महिलेस मारहाण करून लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून शिक्षक दाम्पत्यासह त्यांच्या मुलाविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शिक्षक दाम्पत्यासह मुलास अटक करून न्यायालयात जामिनावर सुटका झाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनुसार, शहरातील भडगाव रोडवरील शाहूनगरमध्ये किशोर नथ्थूराम बिरारी, ज्योती किशोर बिरारी हे प्राथमिक शिक्षक दाम्पत्य मुलगा चेतन यासह राहतात. त्यांचे व फिर्यादी महिला यांच्यात बºयाच दिवसांपासून वारंवार भांडणे व हाणामारीची प्रकरणे घडली. फिर्यादी महिला घरी सायंकाळी पोर्चमध्ये बसलेली होती. तेव्हा शिक्षक दाम्पत्य व त्यांचा मुलगा महिलेच्या घरी काठ्या घेऊन आला. पीडित महिलेच्यो अंगावर धावून जात शिवीगाळ केली. लज्जास्पद भाषेत बोलून विनयभंग केला. शिक्षिका ज्योती बिरारी यांनीही मारहाण केली. यावेळी पीडितेचा पती सेवानिवृत्त सैनिक रमेश पाटील तेथे हजर झाले. तेव्हा त्यांनाही काठीने मारहाण केली.
याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यावरून शिक्षक दाम्पत्याला मुलासह अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता केली.

Web Title: Molestation of a woman at Pachora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.