भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 20:15 IST2018-12-08T20:14:39+5:302018-12-08T20:15:19+5:30
वरणगाव, ता. भुसावळ , जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना शनिवारी सकाळी दहाला घडली. ...

भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग
वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना शनिवारी सकाळी दहाला घडली. याप्रकरणी आरोपी वीरेंद्र फुलसिंग पाटील (२१) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पीडिता ही शाळेत ये-जा करीत असताना आरोपी पाठलाग करायचा. हा प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू होता. शनिवारी आरोपीने शाळेच्या रस्त्यात अडवून पीडितेकडे मोबाइल नंबरची मागणी केली. याबाबत पीडितेचे वडील, भाऊ यांनी आरोपीस जाब विचारला असता त्यांनाही धमकी दिली. याप्रकरणी पीडितेच्या वडिलानी फिर्याद दिली. त्यावरून आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास उपनिरिक्षक नीलेश वाघ करीत आहे.