मोहाडी रुग्णालयाचा मुहूर्त टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST2021-04-06T04:16:11+5:302021-04-06T04:16:11+5:30
जळगाव : मोहाडी येथील महिला रुग्णालयात १०० बेडचे सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली असून, हे डेडिकेटेड कोविड ...

मोहाडी रुग्णालयाचा मुहूर्त टळला
जळगाव : मोहाडी येथील महिला रुग्णालयात १०० बेडचे सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली असून, हे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सोमवारी सुरू होणार होते. मात्र, हा मुहूर्त टळला असून आता मंगळवारी या ठिकाणी हळूहळू रुग्ण हलविण्यात येणार आहेत. यात इकरा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मध्यम स्वरूपाच्या रुग्णांना मंगळवारी दाखल करण्यात येणार आहे.
डॉक्टर, कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली असून, ते मंगळवारी रुजू हाेतील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. दरम्यान, त्यांनी सोमवारी पुन्हा या ठिकाणी पाहणी करून काम पूर्ण करून घेतले. हे रुग्णालय वापरात आल्यानंतर जागेचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.
पाळधीत १५ बेड ऑक्सिजनचे
पाळधी प्राथमिक आरोग्य केंद्रात पंधरा बेडची सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम सुरू करण्यात आली असून, या ठिकाणीही मंगळवापासून रुग्ण दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. टप्प्याटप्प्याने या ठिकाणी बेड वाढविण्यात येतील, त्याप्रमाणे मोहाडी रुग्णालयातही हळूहळू बेडची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती आहे.