मोहाडी, डिकसाई ग्रामपंचायत बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:46 IST2021-01-08T04:46:16+5:302021-01-08T04:46:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील मोहाडी आणि डिकसाई ग्रामपंचातीत जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार असल्याने सर्व सदस्यांची बिनविरोध निवड ...

Mohadi, Dixai Gram Panchayat unopposed | मोहाडी, डिकसाई ग्रामपंचायत बिनविरोध

मोहाडी, डिकसाई ग्रामपंचायत बिनविरोध

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यातील मोहाडी आणि डिकसाई ग्रामपंचातीत जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार असल्याने सर्व सदस्यांची बिनविरोध निवड होणार आहे. या दोन गावांनी तालुक्याला बिनविरोधचा आदर्श घालून दिला आहे. सोमवारी दुपारी चित्र स्पष्ट झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी याच्या नोंदी घेत होते.

मोहाडी येथील ११ जागांसाठी ११ उमेदवारांनी अर्ज केले होते. या सर्वांचे अर्ज वैध ठरल्याने ही ग्रामपंचायत आधीच बिनविरोध झाली होती तर डिकसाई येथे ७ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी सहाजणांनी माघार घेतल्यामुळे या ग्रामपंचायतीतील मतदान टळले असून, सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. डिकसाई गावातील सहाजणांनी माघार घेतल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राम घोरपडे यांनी सांगितले.

Web Title: Mohadi, Dixai Gram Panchayat unopposed