अडीचशे विषयांचे 'मॉडेल प्रश्नसंच' परीक्षार्थींसाठी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 07:26 PM2020-09-24T19:26:27+5:302020-09-24T19:26:41+5:30

अंतिम वर्ष परीक्षा : विद्यापीठाने सरावासाठी प्रश्नसंच केले अपलोड

Model question sets of 250 subjects available for the examinees | अडीचशे विषयांचे 'मॉडेल प्रश्नसंच' परीक्षार्थींसाठी उपलब्ध

अडीचशे विषयांचे 'मॉडेल प्रश्नसंच' परीक्षार्थींसाठी उपलब्ध

Next

जळगाव : अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षार्थींना परीक्षेचा सराव करता यावा म्हणून सुमारे अडीचशे विषयांच्या मॉडेल प्रश्नसंच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्‍यात आले आहे.

नुकतीच विद्यापीठाने संकेतस्थळावर ऑनलाईन परीक्षार्थींसाठी माहिती पुस्तिका देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांसह महाराष्‍ट्र स्टुडंट युनियन व काही विद्यार्थी संघटनांकडून प्रश्नसंच उपलब्ध करून देण्‍याबाबत मागणी होत होती. अखेर गुरूवारी सुमारे अडीचशे विषयांचे मॉडेल प्रश्नसंचल विद्यापीठाने संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. जस-जसे प्राध्यापकांकडून प्रश्नसंचल उपलब्ध होतील तस-तसे मॉडेल प्रश्नसंचल संकेतस्थळावर अपलोड केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने देण्‍यात आली आहे. दुसरीकडे गुरूवारी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट घेण्‍यात आली.



 

Web Title: Model question sets of 250 subjects available for the examinees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.