मोबाईल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:15 IST2021-03-27T04:15:54+5:302021-03-27T04:15:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ईच्छादेवी मंदिर परिसरातील एका घरातून दोन मोबाईल लांबविल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी ...

Mobile thief caught by police | मोबाईल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

मोबाईल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ईच्छादेवी मंदिर परिसरातील एका घरातून दोन मोबाईल लांबविल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी धुळ्यातून फिरोज शेख इकबाल (२२,रा.बिस्मील्ला चौक, तांबापूरा) याला अटक केली आहे. दरम्यान, त्यास न्यायालयात हजर केले असता, २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली आहे.

पंचशिल नगरात रूक्साना राजू तडवी या वास्तव्यास आहेत. १५ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास तडवी कुटूंबिय जेवण करून झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरातील दरवाजा उघडून सुमारे २२ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेले होते. त्यानंतर याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल होता. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला होता. फिरोज याच्या विरोधात यापूर्वी एमआयडीसी आणि नशिराबाद पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Mobile thief caught by police