मोबाईल दुकान दुस:यांदा फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 13:00 IST2017-07-29T12:56:56+5:302017-07-29T13:00:27+5:30

व्यावसायिक भयभीत : श्यामाप्रसाद मुखर्जी संकुलात 2 वर्षात 8 चोरीच्या घटना

Mobile shop blasts another | मोबाईल दुकान दुस:यांदा फोडले

मोबाईल दुकान दुस:यांदा फोडले

ठळक मुद्दे मोबाईल व चाजर्र आदी वस्तूंसह 30 हजाराचा ऐवज लांबविला दोन वर्षात आठ वेळा चोरीच्या घटना छताचा पत्रा वाकवून 20 ते 25 मोबाईल व 7 हजार रुपये रोख असा ऐवज लंपास

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 - जिल्हा परिषदेसमोरील डॉ़ श्यामा प्रसाद मुखर्जी मार्केटमधील कुलूपबंद स्टॅण्डर्ड मोबाईल रिपेअरिंगचे दुकान फोडून चोरटय़ांनी  मोबाईल व चाजर्र आदी वस्तूंसह 30 हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजता उघडकीस आली़ काही महिन्यांपूर्वी हेच दुकान चोरटय़ांनी फोडले होते.  
   शहर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरील मार्केटमध्ये दोन वर्षात आठ वेळा चोरीच्या घटना घडल्याने दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आह़े गेल्या वर्षी 23 ऑगस्ट रोजी  स्टॅण्डर्ड या मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात चोरटय़ांनी याचपध्दतीने छताचा पत्रा वाकवून 20 ते 25 मोबाईल व 7 हजार रुपये रोख असा 40 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता़ 

Web Title: Mobile shop blasts another