मोबाइल स्क्रीनलॉक अपघातात बेततोय जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST2021-07-24T04:12:07+5:302021-07-24T04:12:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांची वेगमर्यादा वाढली आहे. ...

Mobile screen lock on accidental life | मोबाइल स्क्रीनलॉक अपघातात बेततोय जीवावर

मोबाइल स्क्रीनलॉक अपघातात बेततोय जीवावर

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांची वेगमर्यादा वाढली आहे. थोडी जरी चूक झाली तरी अपघाताला सामोरे जावे लागते. अशीच घटना काही दिवसांपूर्वी साकेगावजवळ महामार्गावर घडली होती, त्यात युवक गंभीर जखमी झाला होता. अपघाताची माहिती युवकाच्या कुटुंबीयांना देताना मदत करणाऱ्यांची तारांबळ उडाली. कारण त्या युवकाच्या मोबाईलला फिंगर प्रिंट लॉक होते. हाताला रक्त लागल्यामुळे लॉक उघडून फोन लावताना खूप वेळ गेला. एकाने युवकाची ओळख पटवून संबंधित युवकाच्या घरी माहिती दिली, मात्र ओळख पटली नसती तर फार उशीर झाला असता...

मोबाईलमधील आपली माहिती सुरक्षित रहावी यासाठी अनेक जण मोबाईलला लॉक करतात. त्यात फिंगर प्रिंट लॉक, पॅटर्न लॉक,

पासवर्ड लॉक, फेस लॉक असे प्रकार आहेत.

एखाद्या व्यक्तीसोबत अनुचित घटना घडल्यास त्याला मदतीची गरज असते. यासाठी त्याच्या मित्र किंवा नातेवाईकांना वेळीच माहिती देणे गरजेचे असते.

फोनला नको ॲपला करा लॉक

एखादा व्यक्ती हा व्हॉट्सॲप, फोटो, इतर चॅटमधील माहिती ही खासगी असते. त्यामुळे फक्त अशाच ॲपला लॉक केल्यास फोन लावण्यासाठी कुठल्याही पासवर्डची गरज पडत नाही. त्यामुळे आपला डेटा सुरक्षित राहतोच. सोबतच आपत्कालीन परिस्थितीत मदतीकरिता दुसरा व्यक्ती फोन वापरू शकतो.

एसओएस पद्धतीचा वापर

प्रत्येक मोबाइलमध्ये एमर्जन्सी एसओएस (सेव्ह अवर सोल म्हणजेच मला वाचवा) ही यंत्रणा असते. यात पोलीस, रुग्णवाहिका तसेच आपल्याजवळच्या व्यक्तींचे मोबाइल नंबरदेखील सुरक्षित करता येतात. एखाद्या वाईटप्रसंगी याचा वापर करून मदत घेतली जाऊ शकते.

Web Title: Mobile screen lock on accidental life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.