Mobile burglar arrested | रेल्वेतून मोबाईल चोरणाऱ्याला अटक
रेल्वेतून मोबाईल चोरणाऱ्याला अटक

जळगाव : येथील रेल्वेस्थानकावरुन महाराष्ट्र एक्सप्रेसने अकोल्याकडे जात असलेल्या नितीनकुमार विलास चौधरी (रा.तुकारामवाडी) यांचा मोबाईल व ३३० रुपये असलेले खिशातील पाकिटलांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेतील सईदखान बादरखान (५०), प्रविण विजय चौधरी (२१) व सुरेश गोपाळराव अगले (४५ सर्व रा. अमरावती) या चोरट्यांना लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक करुन मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नितीनकुमार विलास चौधरी हे अकोला जाण्यासाठी मंगळवारी सकाळी जळगाव स्थानकावर आले. महाराष्टÑ एक्सप्रेसमध्ये चढत असतांना चोरट्यांनी त्यांचा मोबाईल व खिशातील पाकिट लांबविले होते. याप्रकाराची तक्रार येताच पोलीस निरीक्षक दिनकर डंबाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिंद्र नगराळे, रामराव इंगळे, रवींद्र ठाकूर, रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक फौजदार प्रसाद सिंग, भूषण पाटील, महेंद्र कुशवाह यांनी अवघ्या तासातच रेल्वे स्थानकावरुन संशयास्पद फिरणाºया सईदखान व प्रविण चौधरी यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता मुद्देमाल घेवून साथीदार एक्स्प्रेसने भुसावळकडे रवाना झाल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने तिसरा संशयित सुरेश अगले यास भुसावळहून ताब्यात घेतले. तिघांची झडती घेतल्यावर मोबाईल तसेच पाकिट मिळून आले. त्यांना बुधवारी भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


Web Title: Mobile burglar arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.