खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन जळगावात इसम जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 14:50 IST2018-04-01T13:01:46+5:302018-04-01T14:50:11+5:30
मांडी भाजली गेल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल

खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन जळगावात इसम जखमी
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १ - घरातून बाहेर पडत असताना पॅण्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईच्या अचानक स्फोट होऊन जळगावातील शनिपेठ भागातील रहिवासी विकार खान शमीउल्ला खान (४२) यांची मांडी भाजून ते जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी घडली. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विकार खाने हे शनिपेठ भागात कुटुंबासह राहतात. रात्री त्यांनी मोबाईल बंद करून ठेवला होता. सकाळी घराबाहेर पडत असताना मोबाईल सुरू केला व तो पॅण्टच्या खिशात ठेवला. पायऱ्या उतरत असताना खिशात ठेवलेल्या मोबाईलच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला व खान यांची मांडी भाजली गेली. त्या वेळी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथए उपचार सुरू आहेत.
मोबाईलचा स्फोट होण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.