आमदार मंगेश चव्हाण घालणार पाटणादेवीला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:18 IST2021-08-23T04:18:52+5:302021-08-23T04:18:52+5:30

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी सहा वाजता य. ना. चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात हभप निवृतिनाथ महाराज (इंदुरीकर) यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले ...

MLA Mangesh Chavan to wear Patna Devi | आमदार मंगेश चव्हाण घालणार पाटणादेवीला साकडे

आमदार मंगेश चव्हाण घालणार पाटणादेवीला साकडे

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी सहा वाजता य. ना. चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात हभप निवृतिनाथ महाराज (इंदुरीकर) यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आषाढी एकादशीनिमित्त शिवनेरी फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय भजन व भक्तिगीत स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे.

दि. २३ रोजी ते आनंदामातेचे आशीर्वाद असून, यावेळी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २३ रोजी श्रावणी सोमवारच्या मुहूर्तावर आमदार मंगेश चव्हाण व प्रतिभा चव्हाण हे सकाळी ८ वाजता आनंदा मातेचे दर्शन घेऊन संकीर्तन आरती करतील. दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत जनतेच्या शुभेच्छा स्वीकारून त्यांच्याशी आपुलकीचा संवाद साधतील. आमदार चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: MLA Mangesh Chavan to wear Patna Devi