आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST2021-08-18T04:23:07+5:302021-08-18T04:23:07+5:30

दरम्यान, पुढील १५ दिवसांत पाणी सोडण्यासंदर्भात उपाययोजना व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास पुन्हा शिवसेनेतर्फे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात ...

MLA Chandrakant Patil launched Jalasamadhi Andolan | आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले जलसमाधी आंदोलन

आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले जलसमाधी आंदोलन

दरम्यान, पुढील १५ दिवसांत पाणी सोडण्यासंदर्भात उपाययोजना व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास पुन्हा शिवसेनेतर्फे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलन स्थळाला शेतकऱ्यांच्या उपस्थितीमुळे अक्षरशः यात्रेचे स्वरूप आले होते.

सुमारे दीड महिन्यांपूर्वी वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेंतर्गत असलेल्या ओझरखेडा धरण पाणलोट क्षेत्रातील शेतकर्‍यांचे केळी व इतर पिके संकटात आल्याने शेतकर्‍यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानुसार, एक महिन्यांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्याने, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक झाली. यात ओझरखेडा धरणात तातडीने हतनूर धरणाचे पाणी सोडण्यासाठी चर्चा होत, पालकमंत्र्यांनी नियमित देखभाल व पंप दुरुस्तीसाठी तत्काळ कार्यकारी संचालक यांच्याशी चर्चा करून निधी उपलब्ध करून दिला होता, परंतु जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत गांभीर्य दाखविलेच नाही.

170821\17jal_2_17082021_12.jpg

ओझरखेडा धरणावर जलसमाधी आंदोलन करताना चंद्रकांत पाटील, समाधान महाजन, छोटू भोई, सुनील पाटील, आनंदराव देशमुख  आदी (विनायक वाडेकर)

Web Title: MLA Chandrakant Patil launched Jalasamadhi Andolan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.