आमदार चंद्रकांत पाटील यांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:24 IST2021-08-17T04:24:08+5:302021-08-17T04:24:08+5:30
आज जलसमाधी आंदोलन मुक्ताईनगर : ओझरखेडा धरण कोरडेठाक मुक्ताईनगर : ओझरखेडा येथील धरणात तातडीने पाणी सोडण्यासाठी पालकमंत्र्यांनी आदेश ...

आमदार चंद्रकांत पाटील यांचे
आज जलसमाधी आंदोलन
मुक्ताईनगर : ओझरखेडा धरण कोरडेठाक
मुक्ताईनगर : ओझरखेडा येथील धरणात तातडीने पाणी सोडण्यासाठी पालकमंत्र्यांनी आदेश तसेच देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. परंतु याबाबत अधिकाऱ्यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. याचा निषेध म्हणून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे मंगळवारी सकाळी ११ वाजता ओझरखेडा धरण येथे जलसमाधी आंदोलन करणार आहेत.
गेल्या दीड महिन्यापूर्वी वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेंतर्गत असलेल्या ओझरखेडा धरण पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांचे केळी व इतर पिके संकटात आल्याने शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. या प्रश्नावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक झाली. यात ओझरखेडा धरणात तातडीने पाणी सोडण्याविषयी चर्चा झाली. परंतु जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी याबाबत आजतागायत काहीच कार्यवाही केली नाही. हतनूर धरणातून विसर्ग सोडण्यात आला. ते पाणी ओझरखेडा धरणाकडे वळवायला हवे होती. आता ओझरखेडा धरण कोरडेठाक होण्याच्या मार्गावर असून या पाणलोट क्षेत्रातील हजारो हेक्टर शेत जमिनीतील केळी सह इतर पिके संकटात सापडली आहेत.
या प्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना भेटून निवेदन दिले आहे. त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आमदार पाटील हे मंगळवारी सकाळी जलसमाधी आंदोलन करणार आहेत.