आंध्रप्रदेशात गेलेला तरुण गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 13:09 IST2020-03-18T13:08:26+5:302020-03-18T13:09:05+5:30
कामाच्या ठिकाणी कंत्राटदाराशी वाद झाला

आंध्रप्रदेशात गेलेला तरुण गायब
जळगाव : गावातील तरुणांसोबत आंध्र प्रदेशातील दुपनी येथे कामाला गेलेला सुनील गरबड पाटील (३५, रा. पाथरी, ता.जळगाव) हा तरुण अचानक गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कामाच्या ठिकाणी तो सहकाऱ्यांसोबतही नाही आणि घरीही आलेला नाही. त्यामुळे कुटुंबाकडून सर्वत्र शोधाशोध सुरु झाली आहे. कामाच्या ठिकाणी ७ मार्च रोजी त्याचा कंत्राटदाराशी वाद झाला व तेथून तो गावाला परत निघाल्याचे सोबतच्या तरुणांकडून सांगण्यात आले. वडील गरबड किशोर पाटील यांनी मंगळवारी पोलीसांकडे कैफियत मांडली.