जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी प्रकाश सुरेश नागपुरे (वय २२, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याच्याविरुध्द शहर पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. त्याआधी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय या अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणी गुणवंत दिनकर पिंगळे (झोपे) रा.रथागड, नेपानगर, जि.बºहाणपूर याच्याविरुध्दही गुन्हा दाखल झाला आहे.पीडित तरुणी १५ वर्ष ८ महिन्याची आहे. ८ एप्रिल २०१८ रोजी वैदीक पध्दतीने पीडित मुलीचे लग्न गुणवंत याच्याशी लावण्यात आले होते. त्यानंतर ही मुलगी माहेरी रामेश्वर कॉलनीत आली असता प्रकाश याने तिला लग्नाचे आमिष दाखवून रेल्वे स्टेशन परिसरातून पळवून नेले होते. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पीडितेच्या जबाबावरुन प्रकाश याच्याविरुध्द बलात्काराचे वाढीव कलम लावले. त्याला अटक करण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी आशिष रोही यांनी दिली.
जळगावात अल्पवयीन मुलीस पळविले, बलात्काराचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 12:50 IST
अल्पवयीन असताना लग्न
जळगावात अल्पवयीन मुलीस पळविले, बलात्काराचा गुन्हा दाखल
ठळक मुद्देपतीविरुध्दही गुन्हा रेल्वे स्टेशन परिसरातून पळवून नेले