अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 12:25 IST2018-10-19T12:24:28+5:302018-10-19T12:25:54+5:30

दोघ मित्रांवर गुन्हा दाखल

Minor girl kidnapped at Jawkheda in Amalner taluka | अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण

अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण

ठळक मुद्देमोटारसायकलवर बसवून नेलेमुलीने सोबत पैसे नेल्याचे उघडकीस

अमळनेर, जि. जळगाव : अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे एका साडे सतरा वर्षाच्या तरुणीला एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना १४ रोजी दुपारी ३ वाजता घडली होती. यात मित्राने मदत केली म्हणून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जवखेडा येथील एक अल्पवयीन मुलीचे आईवडील १४ रोजी धुळे येथे अंत्ययात्रेला गेलेले असताना मुलगी घरी लहान मुलीसोबत एकटी असताना बंटी त्र्यंबक पवार याने दुपारी ४ वाजेच्या सुमारास तिला फूस लावून मोटारसायकलवर बसवून नेले व गावाबाहेर असलेल्या त्याचा मित्र तात्या संभाजी मालचे याच्या ताब्यात दिले. तात्या मालचेने तिला आमिष दाखवून पळवून नेले. सायंकाळी आईवडील घरी आले असता लहान नातीने दुपारची हकीकत सांगितली. त्या अल्पवयीन मुलीने जाताना सोबत पैसे नेल्याचेही उघडकीस आले. मुलीच्या वडिलांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून बंटी व तात्या यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण खैरनार करीत आहेत.

Web Title: Minor girl kidnapped at Jawkheda in Amalner taluka