शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

मागास समुदायातील अल्पवयीन मुलाला झाडाला बांधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 23:25 IST

दलित समाजातील एका मुलाला शेतमालकसह सालदाराने झाडाला बांधून ठेवल्याची संतापजनक घटना अंजनविहीरे येथे तीन दिवसापुर्वी घडली आहे.

ठळक मुद्दे शेतमालकासह सालदाराने बांधल्याची अंजनविहीरेतील संतापजनक घटनादोन आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कभडगाव : कैऱ्या तोडल्या म्हणून दलित समाजातील एका अल्पवयीन मुलाला शेतमालकसह सालदाराने झाडाला बांधून ठेवल्याची संतापजनक घटना तालुक्यातील अंजनविहीरे येथे तीन दिवसापुर्वी घडली आहे. विशेष म्हणजे झाडाला बांधल्याचा व्हीडीओ मोबाईलमध्ये काढून तो व्हाॅट्सअपवर व्हायरल केला. याबाबत पोलीस ठाण्यात शेतमालकासह सालदारावर गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

उल्हासनगर येथिल १७ वर्षीय दलीत युवक शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातील अंजनविहीरे येथे मामाकडे आलेला होता. बारावी वर्गात शिक्षण घेणारा युवक तीन दिवसापुर्वी आपल्या आजीचे गुडघे दुखीचे औषधी घेण्यासाठी गिरड येथे गेला असता औषधी घेऊन अंजनविहीरे येथे घरी परत येत असताना रस्त्यात त्याने गोपी पाटील याच्या शेतातील झाडाच्या कैऱ्या तोडल्या. त्यावेळी सालदार प्रवीण पावरा याने त्याला जाब विचारत शेत मालक विवेक रविद्र पाटील ऊर्फ गोपी पाटील यांस फोन करून शेतात बोलावून घेतले.

नंतर दोघांनी मुलाला मारहाण करत दोराच्या सहाय्याने चिकूच्या झाडाला बांधले. यावेळी 'तो युवक शेत मालकास ‘मामा ! माझी चुक झाली, पुन्हा अस करणार नाही’, असे विनवणी करत होता. यावेळी गोपीने त्याचा व्हीडीओ मोबाईलमध्ये काढत तो व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल केला. तसेच पुन्हा कैऱ्या तोडायला आला तर हातपाय तोडण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडित मुलाने घडलेला प्रकार आपले मामा व आजीला व इतर नातेवाईक यांना सांगितला. 

याबाबत दिनाक ६ जुन रोजी रात्री उशिरा भडगाव पोस्टेला दलित युवकाने दिलेल्या फिर्यादीवरुन भादंवि कलम ३४२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४, अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे ३ (१), सीआरएस व माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम २००८ चे ६६ सी प्रमाणे गुन्हा दाखल करुन विवेक रविद्र पाटील ऊर्फ गोपी पाटील, प्रवीण पावऱ्या यांना अटक झाली आहे. त्यांना जळगाव येथे विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास डीवायएसपी कैलास गावडे करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावBhadgaon भडगावCrime Newsगुन्हेगारी