‘मंगल’च्या विवाह सोहळ्यास मंत्र्यांची हजेरी
By Admin | Updated: April 30, 2017 15:03 IST2017-04-30T15:03:56+5:302017-04-30T15:03:56+5:30
अमरावती येथील शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या ‘मंगल’ चा विवाह सोहळा जळगावच्या रोटरी क्लबच्या पुढाकारातून रविवारी 30 रोजी होत आहे.

‘मंगल’च्या विवाह सोहळ्यास मंत्र्यांची हजेरी
जळगाव - स्व. अंबादास पंत वैद्य मतिमंद, मुकबधिर बालगृह वङझर ता. अचलपूर जिल्हा अमरावती येथील शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या ‘मंगल’ चा विवाह सोहळा जळगावच्या रोटरी क्लबच्या पुढाकारातून रविवारी 30 रोजी होत आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी हजेरी लावली.
सकाळी 11 वाजेपासून या विवाह सोहळ्याच्या विविध विधींना प्रारंभ होईल. खान्देश सेंट्रल मॉल येथे होत असलेल्या या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी हजेरी लावून वधू-वरांना आशिर्वाद दिले.