शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
2
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
3
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
4
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
5
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
6
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
7
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
9
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
10
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
11
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
12
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
13
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
14
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
15
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
16
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
17
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
18
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
19
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
20
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले

मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला; रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 18:39 IST

मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला आहे. रक्तस्त्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वरणगाव येथील शहीद जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना  मानवंदना देण्यासाठी आलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. रक्तस्त्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मंत्री गिरीश महाजन वरणगाव शहरात दाखल झाले व शाहिद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिल्ट्रीच्या ट्रक मध्ये उंचावर जंप मारून चढले, पण ट्रक चा वरचा रॉड थेट त्यांच्या डोक्याला लागला. यावेळी रक्तस्राव झाला. जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांना चक्कर आली. त्याच स्थित मंत्री महाजन यांनी शाहिद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र अर्पण केले व अभिवादन केले. मंत्री महाजन ट्रक वरून खाली उतरले  डोक्याचे रक्त  थांबत नसल्याने उपचारासाठी उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, शेख आखलाक यांनी आग्रह करून तातडीने हॉस्पिटलला दाखल केले. 

उद्धव ठाकरे हे आधुनिक जगातले औरंगजेब, त्यांनी वेगळे काय केले...; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

मंत्री गिरीश महाजन त्याच स्थितीत  शहिद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पत्नीला व परिवाराला जाऊन भेटले. त्यांचं सांत्वन केले, काळजी करू नका. देश सेवा करीत असताना अर्जुन ला वीर मरण आले, याचे दुःख आमच्या मनात आहे. मात्र  मी व राज्य सरकार बाविस्कर यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे असे सांगितले. मंत्री महाजन यांच्या डोक्याला जबर मार लागला असताना सुद्धा पुढे अंत्ययात्रेत तिरंगा सर्कल पर्यंत चालत गेले. तिथे हजारो वरणगाव करांच्या उपस्थित मानवंदना दिली.  डॉ. निलेश पाटील यांनी उपचारासाठी पुढे जाण्याचा सल्ला दिला मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी नाकारत तातडीने नाशिक येथे महत्वाची बैठक असल्याने मला जावे लागणार आहे असे सांगून त्याच स्थितीत मंत्री गिरीश महाजन तातडीने वाहनाने नाशिक कडे रवाना झाले.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनJalgaonजळगाव