जळगावचा किमान पारा १५ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 16:30 IST2018-10-30T16:27:40+5:302018-10-30T16:30:27+5:30
शहराच्या किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत आहे. सोमवारी शहराचे किमान तापमान १५ अंशांपर्यंत खाली आली होते. आठवड्याभरात किमान तापमानात तब्बल ५ अंशांची घट झाली आहे.

जळगावचा किमान पारा १५ अंशावर
ठळक मुद्देकाही दिवसांपासून सातत्याने होतेय तापमानात घटआठवडाभरात किमान तापमानात ५ अंशांची घटपुढील आठवड्यात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता
जळगाव : शहराच्या किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत आहे. सोमवारी शहराचे किमान तापमान १५ अंशांपर्यंत खाली आली होते. आठवड्याभरात किमान तापमानात तब्बल ५ अंशांची घट झाली आहे. गेल्या आठवड्यात किमान पारा २० अंश इतका होता.
किमान तापमानासोबतच कमाल तापमानातही घट होत आहे. तर रात्री गारवा वाढत आहे. पुढील आठवड्यात तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.