‘गिरणा’ची झेप ६४ टक्क्यांवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:21 IST2021-09-17T04:21:38+5:302021-09-17T04:21:38+5:30
चाळीसगाव : उत्तर महाराष्ट्रातील ‘महाकाय’ अशी ओळख असणाऱ्या गिरणा धरणाची साठवण एक्सप्रेस यंदा धीम्या गतीने सुरू आहे. गुरुवार अखेर ...

‘गिरणा’ची झेप ६४ टक्क्यांवर !
चाळीसगाव : उत्तर महाराष्ट्रातील ‘महाकाय’ अशी ओळख असणाऱ्या गिरणा धरणाची साठवण एक्सप्रेस यंदा धीम्या गतीने सुरू आहे. गुरुवार अखेर ६४.४२ टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे धरण आणखी भरण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
गिरणाच्या अमृतधारेने निम्म्या जिल्ह्याची तहान भागविली जाते. धरण शंभर टक्के भरल्यास सिंचनासाठी तीन आवर्तने मिळतात. धरणाच्या वरील भागात असणारी हरणबारी, केळझर, नागासाक्या, पुनद आणि माणिकपुंज ही धरणे १०० टक्के भरली आहेत. रब्बी हंगामासाठीही फायदेशीर ठरणार आहे.
चौकट
गिरणा धरणाची एकूण साठवण क्षमता २१ हजार ५०० दशलक्षघफू असून उपयुक्त साठा १८ हजार ५०० दशलक्षघफू इतका असतो. गुरुवार अखेर धरणात १४ हजार ९१७ दशलक्षघफू जलसाठा झाला आहे. गेल्यावर्षी १६ सप्टेंबर अखेर धरणात ९९.६८ इतका जलसाठा झाला होता. २०१९ मध्ये गिरणा धरण २६ सप्टेंबर रोजी ओव्हरफ्लो झाले होते.
....... चौकट
हॅटट्रीक साधणार की चुकणार
गिरणा धरण २०१९ व २०२० मध्ये शतकी सलामी देत ओव्हरफ्लो झाले. यावर्षी मात्र त्याची एक्सप्रेस धीम्या गतीने सुरू आहे. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने गिरणाला हात दिला होता. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्येही गिरणा खळाळून वाहत होती. गिरणा धरणाच्यावरील भागातील प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून धरणात यामुळे आवक सुरू झाली आहे. हॅटट्रीक साधणार की चुकणार ? याबाबत औत्सुक आहे. .....
चौकट -
मालेगावसह चाळीसगाव, नांदगाव या शहरांना धरणातूनच पाणीपुरवठा होतो.
- दहीवाळ तसेच २५ गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा स्रोत गिरणा धरणच आहे.
- जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १५४ ग्रामपंचायतींना गिरणा धरणातून पाणीपुरवठा होतो.
- गिरणा धरणाची आतापर्यंतची शंभरी
६ ऑक्टोबर १९७३,
२६ सप्टेंबर १९७६,
२९ सप्टेंबर १९८०,
११ ऑक्टोबर १९९४,
६ ऑक्टोबर २००४,
२ ऑगस्ट २००५,
२३ सप्टेंबर २००६,
१५ सप्टेंबर २००७,
१७ सप्टेंबर २०१९,
१६ सप्टेंबर २०२०