‘गिरणा’ही पन्नाशीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:48+5:302021-09-07T04:20:48+5:30
निम्म्याहून मध्यम प्रकल्प १०० टक्के जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी निम्मे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. भोकरबारी प्रकल्प वगळता इतर ...

‘गिरणा’ही पन्नाशीकडे
निम्म्याहून मध्यम प्रकल्प १०० टक्के
जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी निम्मे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. भोकरबारी प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांमध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. गेल्या महिन्यापर्यंत शून्य टक्के जलसाठा असलेले अग्नावती धरण १०० टक्के भरले आहे. यासोबतच अभोरा, मंगरूळ, सुकी, हिवरा, बोरी, मन्याड हे प्रकल्प १०० टक्के भरले असून, भोकरबारीत केवळ १६.८४ टक्के जलसाठा आहे, तर मोर धरणात ६५.९१, बहुळा - ८५.०३, तोंडापूर धरण ९३.४१ टक्के, अंजनी - ४७.८८, गूळ - ३२.३७ टक्के असा मध्यम प्रकल्पात एकूण ८३.२४ टक्के जलसाठा आहे. ९६ लघु प्रकल्पांत मात्र अजूनही केवळ २२.५५ टक्के जलसाठा आहे. यात ५ रोजी ५५ टक्क्यांवर असलेल्या तोंडापूर धरणात एकाच दिवसात ३८.४१ टक्क्यांनी वाढ होऊन हे धरण ९३.४१ टक्क्यांवर पोहोचले आहे.