अज्ञात वाहनाच्या धडकेत दूधविक्रेता ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:42 PM2021-02-28T17:42:50+5:302021-02-28T17:43:40+5:30

दूध विक्रेत्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक मारल्याने जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली

Milk seller killed in unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेत दूधविक्रेता ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दूधविक्रेता ठार

Next
ठळक मुद्देदूध वाटप करून घरी परतत असताना दुर्घटना.

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : अज्ञात वाहनाने दूध विक्रेत्या तरुणाला धडक मारल्याने जागीच ठार झाल्याची घटना २६ रोजी रात्री साडेआठ वाजता ताडेपुरा रस्त्यावर घडली.

खेडी खुर्द प्र अमळनेर येथील राहुल भालेराव पाटील (२६) हा २६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातून सायकलवरून दूध वाटप करून घरी परतत असताना ताडेपुरा भागात आबासो एस. एस. पाटील आश्रमशाळेजवळ त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. तो सायकलसह खाली पडल्याने त्याला छातीत व पोटात मार लागला होता. धडक देणारा वाहन चालक फरार झाला होता. राहुल याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

शरद मधुकर पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यानंतर अज्ञात वाहन चालकविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल भरत ईशी करीत आहेत.

Web Title: Milk seller killed in unidentified vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.