दूध टँकरच्या धडकेत तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 22:19 IST2019-02-22T22:19:03+5:302019-02-22T22:19:21+5:30
मेहुणबारे, ता.चाळीसगाव : भरधाव वेगात जाणाऱ्या जळगाव दूध संघाच्या टँकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात भरत लक्ष्मण मोरे (वय २७) ...

दूध टँकरच्या धडकेत तरुण ठार
मेहुणबारे, ता.चाळीसगाव : भरधाव वेगात जाणाऱ्या जळगाव दूध संघाच्या टँकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात भरत लक्ष्मण मोरे (वय २७) हा तरुण जागीच ठार झाला. हा अपघात चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव येथे शुक्रवारी सकाळी झाला.
धामणगाव (ता.चाळीसगाव) येथील संदीप निकम यांच्या दूध डेअरीवरून नेहमी प्रमाणे दुधाचे टँकर क्रमांक ( एमएच १९, सीवाय २७९९) भरधाव वेगाने मेहुणबारेकडे येत असताना मेहुणबारेकडून भरत मोरे हा दुचाकीने जात असताना गावाजवळील शालिग्राम वाघ यांच्या घराजवळ टँकरने जोरदार धडक दिली. यात भरत मोरेच्या डोक्याचा भाग टँकरच्या पुढच्या चाकाखाली आल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन करूण अंत झाला. ही घटना गावातच घडल्याने घटनास्थळी सर्व गाव जमा झाले होते.
अपघातानंतर टँकर चालक तेथून टँकरसह पसार झाला. याप्रकरणी धर्मा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टँकर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मेहुणबारे पोलीस करीत आहेत.