शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

दूध आणि पाणी एकाच किमतीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:58 AM

'पातळ' झाले दर : उत्पादकांची परवड, भावाच्या चढ-उताराने शेतकरी हैराण

ठळक मुद्देजिल्हाभर दूध सोसायट्या आणि संस्थांच्या माध्यमातून उत्पादकांकडून दूध संकलन करण्यात येते. दरदिवशी जिल्हा दूध संघाकडून दोन लाख लीटर गाईच्या दुधाची खरेदी होते. गाईच्या तुलनेत म्हशीच्या दुधाचे संकलन अवघे ६० हजार लीटर आहे.गेल्या दहा ते बारा वर्षात दुधाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. तुलनेत म्हशीचे दूध पुरणारे नव्हते. म्हणूनच राज्यभर गाईच्या दुधाचे उत्पादन जाणीवपूर्वक वाढविण्यात आले. याचे दृष्य परिणाम खान्देशातही स्पष्ट दिसून आले आहे. गाईंची संख्या वाढली आहे.

जिजाबराव वाघ ।चाळीसगाव (जि.जळगाव) : दुधाच्या खरेदी दरात सातत्याने चढउतार होत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, सद्य:स्थितीत बिसलरीचे एक लीटर 'पाणी' आणि 'दूध' यांची किंमत जवळपास सारखी झाली आहे. उत्पादन खर्च अधिक आणि 'पातळ' झालेले भाव यामुळे शेतकºयांच्या हाती जनावरांचे 'शेण'ही उरणार नाही, अशी परिस्थिती आहे. या दुधबाणीमुळे पशुपालकांमध्ये सरकारविषयी खदखद आहे.चाळीसगावची ओळख संपूर्ण राज्यात 'दूधगंगा' म्हणून आहे. गेल्या काही वर्षात पशुपालन व्यवसाय आतबट्ट्याचा झाल्याने येथील दूधगंगेला आहोटी लागली. अनेक संकटांची रांग दूध उत्पादकांसमोर असल्याने भावातील तफावतही मारक ठरत आहे. जळगाव जिल्हा दूध संघाकडून मार्चपर्यंत गाईचे दूध २६ रुपये तर म्हशीचे दूध ४२ रुपये प्रति लीटरने खरेदी केले जात होते. मात्र दूध पावडरचे दर कोसळल्याने दुधाचे दर 'पातळ' म्हणजे प्रति लीटर तीन रुपये पंच्याहत्तर पशांनी खाली आले आहे. सद्य:स्थितीत दूध संघ गाईचे दूध २२ रुपये पंचवीस पैसे तर म्हशीचे दूध ४० रुपये प्रति लीटरने खरेदी करीत आहे.यामुळे दूध व्यवसायासमोर टिकून राहण्याचे मोठे आव्हान आहे. बिसलरी पाणी व दुधाचे एकच झालेले भाव पाहता या व्यवसायातील शेतकरी आणि पशुपालकांची परवड लक्षात यावी.दूध पावडचे दर पडलेबाजारात दूध पावडरचे दर पडल्याने गाईच्या दुधाचे भाव खाली आले आहेत. राज्यभर दूध संघांनी कमी दर देण्याचा सपाटा लावला असून यामुळे दुधदुभत्याचा व्यवसाय शेतकºयांच्या हाताबाहेर गेला आहे.जळगाव दूध संघ दरदिवशी सहा टन दूध पावडर तयार करते. मार्चच्या आधी हे उत्पादन १५ टन होते. दूध पावडचे भाव पडल्याने मागणीही कमी झाली आहे. गाईच्या दुधाची पावडर १२० रुपये प्रतिकिलो तर म्हशीच्या दुध पावडरचे दर १४० रुपये प्रति किलो आहेत. मार्चपर्यंत दूध संघाने तोटा सहन करीत गाईचे दूध २६ रुपये प्रतिलीटर खरेदी केले. मात्र दूध पावडर बाजारात तेजी न आल्याने संघाने तीन रुपये ७५ पैशांनी गाईच्या दुधाचे दर कमी केले आहेत.'गोकुळ'कडून १८ रुपयांनी खरेदीराज्यातील आघाडीचा दूध संघ असणाºया ‘गोकुळ’कडून कार्यक्षेत्राबाहेरील गाईचे दूध १८ रुपये प्रति लीटरने खरेदी केले जाते.हाती 'शेण'ही नाही : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी पशुपालन करतात. एकेकाळी चाळीसगावचा दूध व्यवसाय संपूर्ण राज्यात 'मॉडेल' ठरला होता. वीस वर्षापूर्वी लाखात व्यवहार व्हायचे. त्यावेळी चाळीसगावच्या दुधगंगेत कोटीमध्ये उलाढाल होत असे. कालौघात हे चित्र पालटले असून दुधगंगाही आटली आहे. सद्यस्थितीत तर महागलेले पशुखाद्य, वाळलेले वैरण व पशुवैद्यकीय सेवेने गाय दूध उत्पादक कमालीचा संकटात सापडला आहे. खर्च आणि उत्पादन यांचा मेळ घालतांना शेतकºयांच्या पदरात पडणारे 'शेण' देखील मिळणार नाही, अशी बिकट परिस्थिती आहे.