अमळनेर शहरात मध्यरात्री दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:03 IST2018-05-28T15:03:57+5:302018-05-28T15:03:57+5:30
दोघांच्या हाणामारीचे रूपांतर दोन गटातील दंगलीत होऊन एकच्या डोक्यावर तलवार हल्ला करून जखमी करण्यात आले. एक महिलेचे मंगळसूत्र हिसकावून विनयभंग करण्यात आल्याची घटना २७ रोजी रात्री अकरा वाजता फरशी रोड वर घडली. दोन्ही गटातील ३१ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अमळनेर शहरात मध्यरात्री दंगल
आॅनलाईन लोकमत
अमळनेर, दि.२८ - दोघांच्या हाणामारीचे रूपांतर दोन गटातील दंगलीत होऊन एकच्या डोक्यावर तलवार हल्ला करून जखमी करण्यात आले. एक महिलेचे मंगळसूत्र हिसकावून विनयभंग करण्यात आल्याची घटना २७ रोजी रात्री अकरा वाजता फरशी रोड वर घडली. दोन्ही गटातील ३१ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कल्पनाबाई अनिल रामराजे यांनी फिर्याद दिली आहे. २७ रोजी रात्री ११ वाजता त्यांचा मुलगा राजरत्न व जाबिर कुरेशी याचा मुलगा ( नाव माहीत नाही) यांचे भांडण सुरू होते. त्यावेळी जाबिर कुरेशी हा देखील राजरत्न ला मारत होता गल्लीतील लोकांनी भांडण सोडवले आणि घरी पाठवले. मात्र काही वेळेनंतर जाबिर कुरेशी, मोहसीन कुरेशी यांच्यासह जमावाने लाठ्या, काठ्या व मटण कापण्याचा सूरा घेऊन धावून आले आणि जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र काढून घेतले मारहाण केली.
दुसऱ्या गटातर्फे अलाक नफिस अहमद याने फिर्याद दिली आहे. २७ रोजी रात्री मित्र जाकीरखा जहिर खा हा चौकातून फरशी कडे जात असताना राजरत्न व त्याच्या मित्रांनी त्याला मारहाण केली. गल्लीतील लोकांना घेऊन चौकात गेलो असता राजरत्न रामराजे, आकाश मांगु संदनशिव यांच्यासह जमावाने हल्ला करीत मारहाण केली. याप्रकरणी अमळनेर पोलिसात १४ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.