अडावद येथे मध्यरात्री घराला आग

By Admin | Updated: March 31, 2017 15:30 IST2017-03-31T15:30:20+5:302017-03-31T15:30:20+5:30

अडावद येथील वरच्या माळी वाडय़ातील घराला मध्यरात्री आग लागली. यात संसारपयोगी वस्तु, शेती अवजारे जळुन खाक झाली.

Midnight house fire at Adawad | अडावद येथे मध्यरात्री घराला आग

अडावद येथे मध्यरात्री घराला आग

 चोपडा दि.31- तालुक्यातील अडावद येथील वरच्या माळी वाडय़ातील घराला मध्यरात्री आग लागली. यात संसारपयोगी वस्तु, शेती अवजारे जळुन खाक झाली. आगीत सव्वा लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला.

अडावद येथील वरचा माळीवाडा भागात  जगन्नाथ गंगाराम महाजन यांचे दुमली घर आहे. महाजन परिवार खालच्या मजल्यावर झोपले असतांना रात्री 12.30 वाजेच्या सुमारास वरच्या मजल्यावर आग लागली.घराला आग लागल्याचे गल्लीतील नागरिकांना समजले.त्यांनी आरडाओरडा करीत महाजन परिवाराला बाहेर काढल्याने जिवीत हानी टळली.
आगीत वरच्या मजल्यावरील टीव्ही ,अन्नधान्य, कपडे, दरवाजे, खिडक्या, शेती अवजारे जळुन खाक झाली.परिसरातील नागरिकांनी पाण्याचा मारा करीत अध्र्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले.शुक्रवारी सकाळी तलाठी व्ही.डी.पाटील यांनी पंचनामा केला.त्यात 1 लाख 20 हजार 500 रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.तर आगीत आडीच लाखांचे नुकसान झाल्याचे घर मालकाचे म्हणणे आहे .

Web Title: Midnight house fire at Adawad