MIDC officials spread over irregularities in work | कामातील अनियमिततेवरून एमआयडीसीचे अधिकारी फैलावर
कामातील अनियमिततेवरून एमआयडीसीचे अधिकारी फैलावर

जळगाव : एमआयडीसीमधील प्लॉट देणे असो की शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा पुरविणे असो, चिरीमिरी घेतल्या शिवाय तुम्ही कोणतेच काम करीत नाही. आपल्या कामाच्या पद्धतीत सुधारणा करा अशा सूचना देत उद्योजकांच्या अडीअडचणी वाढत असून आमच्या संयमाचा अंत पाहू नका अशी तंबी खासदार उन्मेष पाटील यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना गुरुवारी संवाद सभेदरम्यान दिली.
औद्योगिक वसाहत परिसरातील उद्योजकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी गुरुवारी जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने खासदार उन्मेष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांनी क्षेत्रीय अधिकारी अमित भामरे यांच्या कारभारातील अनियमिततेबाबत झाडाझडती घेतली.
गुरुवारी दुपारी तीन वाजता बाजार समितीच्या समोरील अजिंठा लॉन्स येथे ही सभा झाली. या बैठकीस उद्योग आघाडीचे कंवरलाल संघवी, अरुण बोरोले, चंद्रकांत बेंडाळे, किशोर ढाके, बिपिन पाटील, समीर साने, समीर राणे, नितीन इंगळे, एमआयडीसी क्षेत्रीय अधिकारी अमित भामरे, गिरी, जिल्हा उद्योग केंद्राचे साहेबराव पाटील, महावितरण, बीएसएनएल, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, कामगार कल्याण, अग्निशामक यंत्रणा यांच्यासह विविध वीस विभागांचे अधिकारी तसेच उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यपद्धतीत बदल करा अन्यथा गंभीर दखल घेणार
गेल्या पाच वर्षात विविध कामे करून एमआयडीसी मधील उद्योग वाढीसाठी प्रयत्न केला. मोठा निधी मंजूर करून आणला. मात्र अधिकाºयांनी आपल्या स्वार्थासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने कुठलीही सुसूत्रता ठेवली नाही. संवाद ठेवला नाही. त्यामुळे चांगले काम करूनही उद्योजक बांधवांची नाराजी आहे. तुम्ही अजूनही आपल्या कार्यपद्धतीत बदल करा अन्यथा मला गंभीर दखल घ्यावी लागेल असा इशारा आमदार सुरेश भोळे यांनी दिला.
बुधवार, गुरुवारी अधिकारी मुख्यालयात थांबा
एमआयडीसीतील अडीअडचणी बाबत अधिकाºयांना भेटण्यासाठी उद्योजक येतात, त्यावेळी अधिकारी भेटत नसल्याच्या तक्रारी उद्योजकांनी खासदार पाटील यांच्या समोर मांडल्या. त्यावर खासदार पाटील यांनी अधिकाºयांना जाब विचारला. यावेळी क्षेत्रीय अधिकारी भामरे निरुत्तर झाले. मुख्यालयात थांबून बुधवार, गुरुवार उद्योजकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी हजर राहवे, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. यावेळी अनेक विषयांवर उद्योजक बांधवांनी आपले मत व्यक्त केले.

Web Title: MIDC officials spread over irregularities in work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.