मतदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचा जळगावात रॅलीद्वारे संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 13:07 IST2019-10-19T13:07:03+5:302019-10-19T13:07:36+5:30
‘रोटरी’तर्फे मतदान जनजागृती

मतदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचा जळगावात रॅलीद्वारे संदेश
जळगाव : शहरातील रोटरी क्लब जळगाव परिवारातर्फे शुक्रवार, १८ रोजी सकाळी शिवतीर्थ मैदानापासून मतदान जनजागृती रॅली काढण्यात येऊन त्याद्वारे मतदान करण्याचे शहरवासीयांना आवाहन करण्यात आले. या सोबतच विविध चौकात जनजागृती पत्रकांचे वितरण करीत मतदानासारख्या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचा संदेश देण्यात आला.
शिवतीर्थ मैदानावर निवडणूक निरीक्षक डॉ. पार्थसारथी मिश्रा, रुपक मुजुमदार, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, प्रेसिडेंट एन्क्लेल्यू डॉ.राजेश पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलावळे, तहसीलदार वैशाली हिंगे, सहप्रांतपाल डॉ. तुषार फिरके, अनिल एम.अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ झाला. रॅलीचे नेतृत्व रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष कॅप्टन मोहन कुलकर्णी, मानद सचिव संदिप शर्मा, रोटरी वेस्टचे अध्यक्ष डॉ. सुशीलकुमार राणे, सचिव सुनील सुखवाणी, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष डॉ.राहुल मयूर, सचिव सुशील राका, रोटरी गोल्डसिटीचे अध्यक्ष संजय दहाड, मानद सचिव राहुल कोठारी, रोटरी ईस्टचे अध्यक्ष विनोद पाटील, रोटरी स्टारचे सचिन करण ललवाणी, रोटरी मिडटाऊनच्या माजी अध्यक्षा डॉ.सुमन लोढा, इनरव्हिल न्यू जेनच्या अध्यक्षा वैशाली सुरतवाला, रोटरॅक्टचे डी.आर.आर. शंतनू अग्रवाल, रोटरॅक्ट वेस्टचे अध्यक्ष अमृत मित्तल, रोटरॅक्ट देवकर कॉलेजच्या अध्यक्षा पूनम सोनार आदींनी नेतृत्व केले. शिवाजी महाराज पुतळ््यापासून नेहरू चौक, टॉवर चौक, चौबे मार्केट, सुभाष चौक, पांडे डेअरी चौक, सिंधी कॉलनी चौक, शिरसोली नाका, मोहाडी रोड, आदर्श नगर, गणपती नगर, सागर पार्क, भाऊंचे उद्यान, महाबळ रोड मार्गे रली काढण्यात येऊन मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे समारोप झाला.
या रॅलीत सर्व रोटरी क्लब, इनरव्हील क्लब व रोटरॉक्ट क्लबचे सदस्य दुचाकी, चारचाकी वाहनधारक रोटरी सदस्य सहभागी झाले होते. त्यांनी जनजागृती पत्रकांचे विविध चौकात वितरण केले.