ममुराबादला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST2021-07-24T04:12:00+5:302021-07-24T04:12:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : नागरिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या वर्गातील गुणवंत ...

ममुराबादला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : नागरिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेच अध्यक्ष अनिल वसंतराव पाटील, चिटणीस अशोक विश्वनाथ गावंडे, मुख्याध्यापक विष्णू प्रभाकर चौधरी आदी उपस्थित होते. नेहरू विद्यालयातुन दहावीच्या परीक्षेला ६७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होते. त्यापैकी १६ विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये, ३७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १४ विद्यार्थी दुसऱ्या श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. वर्गशिक्षिका संगीता एस.पाटील, अशोक ए.सपकाळे, अनिता आर. सावळे व शिक्षक सहकारी उपस्थित होते. आर. टी. निकम यांनी सूत्रसंचालन केले.
-------------------
फोटो: ममुराबाद येथील नेहरू विद्यालयात सन्मानित करण्यात आलेले गुणवंत विद्यार्थी व संस्थेचे पदाधिकारी.