शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

सोमवारपासून विद्यापीठात संशोधन व मान्यता समितीच्या सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 21:58 IST

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत संशोधन व मान्यता समितीच्या (आर.आर.सी.) सभा विद्याशाखा व विषय निहाय विद्यापीठाच्या ...

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत संशोधन व मान्यता समितीच्या (आर.आर.सी.) सभा विद्याशाखा व विषय निहाय विद्यापीठाच्या विविध प्रशाळेत १४ ते १६ आॅक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून संशोधन आराखडा सादर करण्याचे आवाहन विद्यापीठाच्या संशोधन विभागाने केले आहे.विद्यापीठामार्फत सन २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या पेट परीक्षा उत्तीर्ण केलेल्या व जुलै-२०१८ मध्ये प्री-पीएच.डी. कोर्सवर्क केलेल्या विद्यार्थ्यांची प्री-पीएच.डी. कोर्सवर्क पेपर १ व २ आॅनलाईन पुरक परीक्षा विद्यापीठाच्या आॅनलाईन परीक्षा सेंटरमध्ये ५ मे, २०१९ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांनी आपला संशोधन आराखडा मंजूर करुन घेण्यासाठी संशोधन व मान्यता समितीची (आर.आर.सी.) सभा १४ ते १६ आॅक्टोबर या दरम्यान होणार आहे. त्यामध्ये १४ रोजी सकाळी ११ वाजता युनिर्व्हसिटी इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे इंजिनिअरिंगच्या केमिकल, केमिकल टेक्नॉलॉजी,बायोटेक्नॉलॉजी, सिव्हील, इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक्स ?ण्ड टेलिकॅम्युनिकेशन , इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल, प्रॉडक्शन अ‍ॅण्ड अ‍ॅटोमोबाईल, इन्स्ट्रुमेंटेशन व फार्मसी विषयांच्या सभा होतील. आणि स्कुल आॅफ कॉम्प्युटर सायन्सेय येथे इंजिनियरिंगच्या कॉम्प्युटर आणि इनफार्मेशन या विषयाच्या सभा होणार आहेत. स्कुल आॅफ मॅनेजमेंट स्टडिज येथे सकाळी ११ वाजता कॉमर्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट विषयांकरीता सभा होईल.१५ रोजी सकाळी ११ वाजता स्कुल आॅफ लँगवेज अ‍ॅण्ड रिर्सच सेंटर येथे मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत व उर्दु या विषयांसाठी, स्कुल आॅफ सोशल सायन्सेस येथे इकोनॉमिक्स, हिस्ट्री, फिलॉसाफी, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क्स, सोशालॉजी तर नॉलेज रिर्सोस सेंटर (सेंट्रल लायब्ररी) येथे डिफेन्स अ‍ॅण्ड स्ट्रॅटजिक स्टडिज,सायकोलॉजी, योगा आणि लॉ, डॉ. आंबेडकर थॉटस, लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फार्मेशन, मास कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम या विषयांसाठी सभा होईल.१६ रोजी सकाळी ११ वाजता स्कुल आॅफ फिजिकल सायन्सेस येथे फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, स्कुल आॅफ मॅथेमेटिकल सायन्सेस येथे मॅथेमॅटिक्स, स्टॅटस्टिक, स्कुल आॅफ केमिकल सायन्सेस येथे केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्सेस येथे कॉम्प्युटर सायन्स, इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी, स्कुल आॅफ लाईफ सायन्सेस येथे झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, स्कुल आॅफ इन्व्हार्नमेंटल सायन्सेस येथे इन्व्हार्नमेंटल सायन्स, जिओग्राफी विषयाच्या सभा होणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून आपला संशोधन आरखडा मंजूर करुन घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगीनवरुन संशोधन आराखड्याचे शिर्षक १३ आॅक्टोबर पर्यंत अपलोड करावे.जानेवारी, २०१९ मध्ये प्री-पीएच.डी. कोर्स आॅनलाईन परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. व फेब्रुवारी ,२०१९ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी संशोधन आराखडा संशोधन व मान्यता समितीपुढे सादर केलेले नाही किंवा सादर केल्यानंतर आराखडा नामंजूर करण्यात आलेला आहे. अशा विद्यार्थ्यांनीसुध्दा या समितीपुढे उपस्थित राहून संशोधन आराखडा मंजूर करुन घ्यावा, असे संशोधन विभागाचे उपकुलसचिव अ.चि.मनोरे, यांनी कळविले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव